इंदापूर प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : शुक्रवार दि.३१/०१/२०२५ रोजी विठ्ठलराव थोरात इंग्लिश मेडियम स्कूल व जुनिअर कॉलेज भिगवण येथे आनंदी बाजार ( Happy Market ) खाऊ गल्ली मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. उपक्रमाला पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी व्यापाराचे व्यवहार ज्ञान प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून घेतले शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील असून आपले पालक शेतातील पालेभाज्या, फळे, धान्य कशाप्रकारे विकतात. ग्राहकांना भाजीपाला घेण्यास कसे प्रवृत्त करतात. याचा अनुभव विद्यार्थ्यांनी यावेळी घेतला. आयुष्य जगत असताना उपयुक्त असणारे व्यवहार ज्ञानदेखील मिळवले. या उपक्रमाच्या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा. मारुतराव थोरात सर यांच्या हस्ते रिबीन कट करून उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. बापुराव थोरात सर, संस्थेचे सचिव मा. विजयभैय्या थोरात सर, खजिनदार मा. संतोष थोरात सर, सदस्य मा. नंदकिशोर थोरात सर, मा. अजय थोरात सर, संचालिका सौ. संगीताताई थोरात, सौ. सुशिलाताई थोरात मॅडम, सूनिताताई थोरात मॅडम, पूजाताई थोरात मॅडम, सोनाली ताई थोरात मॅडम, हिराबाई बंडगर, संस्थेच्या प्राचार्य सौ. वंदना थोरात मॅडम, तसेच यावेळी उपक्रमाला मा. सौ. अनुष्काताई भरणे उपस्थित होत्या. त्यांनी प्रत्येक स्टॉल वरती जाऊन मुलांना मार्गदर्शन केले व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी भिगवण गावचे पदाधिकारी, अधिकारी ग्रामस्थ, पालकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गायकवाड सर व सौ. साबळे मॅडम यांनी केले. तर आभार सौ. साबळे मॅडम यांनी मानले. अशा प्रकारे विठ्ठलराव थोरात इंग्लिश मेडियम स्कूल व जुनिअर कॉलेज भिगवण या ठिकाणी आनंदी बाजार ( Happy Market ) मोठया उत्साहात साजरा झाला.
Homeशिक्षण विषयीराजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित, विठ्ठलराव थोरात इंग्लिश मेडियम स्कूल व जुनिअर कॉलेज भिगवण येथे आनंदीबाजार उत्साहात
राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित, विठ्ठलराव थोरात इंग्लिश मेडियम स्कूल व जुनिअर कॉलेज भिगवण येथे आनंदीबाजार उत्साहात

0Share
Leave a reply