दौंड प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : खडकी तालुका दौंड येथे श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, व इतर योजनेचे आधार कार्ड अपडेट व मोबाईल नंबर लिंक ( DBT )करण्यासाठी मेळावा घेण्यात आला होता .यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे समितीचे व्यवस्थापक वाघमारे साहेब यावेळी विधवा ,विदुर घटस्फोटीत,दिव्यांग, बांधवांचे आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक करून घेत होते.
यावेळी खडकी गावचे सरपंच छबुबाई गुणवरे , उपसरपंच आकाश शिंदे, भीमराव बिरंगुले, वैशाली गुणवरे, विठाबाई पवार,अनिल शिंदे, तात्या शिंदे, दादासाहेब ढमे, तात्या भोसले बापू कोपनर, अविनाश काळे, बाळासाहेब काळे ,विलास काळे, अशोक भोसले, सुधीर लोखंडे, बाबासाहेब जगताप, जालिंदर भाऊ दिवेकर, बाळासाहेब नानवर, इत्यादी खडकी , खानोटा, मलठण येथील व आसपासच्या परिसरातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तात्यासाहेब शिंदे, अनिल शिंदे व इतर दिव्यांग बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.
Leave a reply