तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हंगलगुंडे : व्यापारी व गावकरी यांचे हित डोळ्यासमोर ठेवून मुख्य रस्त्याचे काम पारदर्शक व टिकाऊ करण्याच्या कामी गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा युवा नेते अड. दीपक दादा आलूरे यांनी केले आहे. अणदूर येथे तुळजापूर तालुक्याचे विकासाभिमुख नेतृत्व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सहा महिन्यापूर्वी बस स्थानक ते खंडोबा मंदिर या मुख्य रस्त्याच्या कामासाठी जवळपास दोन कोटीचा निधी मंजूर केला होता. त्याची पूर्तता झाली असून या कामाचा प्रारंभ झाला आहे, व्यापाऱ्यांचे हित व मुख्य रस्त्याचे पारदर्शक व टिकाऊ काम निश्चितच गावच्या वैभवात भर पडणारे आहे. ग्रामपंचायतीने या कामात पुढाकार घेऊन गावच्या ऐतिहासिक रस्त्याच्या कामात योगदान देण्याची मागणी ही केली जात आहे.
तीर्थक्षेत्र अनदूर करांचे अनेक वर्षाचे स्वप्न आमदार राणा दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. धाराशिव जिल्ह्यात सर्वात मोठे 17 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत आलूरे, चव्हाण, मुळे यांचे प्राबल्य आहे. विकास कामात गावकऱ्यांचे योगदान मोठे असून हीच परंपरा कायम राखण्याचे गरज असल्याचे प्रतिक्रिया ऐकवयास मिळत आहे.जवळपास 30 हजार लोकवस्तीच्या गावात शैक्षणिक सामाजिक राजकीय व धार्मिक महत्त्व असून राज्याबरोबरच कर्नाटक व आंध्र राज्यातून खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मल्हारी मार्तंड चरणी नतमस्तक होण्यासाठी वरदळ असते, मराठवाड्यात शैक्षणिक दृष्ट्या खास ओळख आहे. त्यामुळे ही गरज लक्षात घेऊन आमदार राणा दादा पाटील यांनी गावच्या हितासाठी महत्त्वकांक्षे योजना मार्गे लावल्याने गावकऱ्यातून आनंद व समाधान व्यक्त केला जात आहे. गावच्या विकास कामात सर्वांनी सहकाऱ्यांची भावना राखून सहकार्य करण्याचे आवाहन ही आलूरे यांनी केले आहे.
विकास कामात बाधा न आणता, व्यापारी आणि गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचे अड. आलूरे यांचे आवाहन

0Share
Leave a reply