राहुरी प्रतिनीधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी पोलीस स्टेशन ने विना नंबर प्लेट कारवाई करून चोरीचे वाहन पकडण्याची मोहीम राबवली होती.परंतु पोलिसांच्याच गाडीला फॅन्सी नंबर प्लेट असल्याची तक्रार राहुरी पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाल्याने ट्राफिक पोलीस हवालदार बापू फुलमाळी येणे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या गाडीवर फॅन्सी नंबर प्लेटची कारवाई करून एक हजार रुपये दंड आकारून सदर दंड भरून घेतला व एक आदर्श प्रस्थापित केला. तसेच सदर गाडी पोलीस स्टेशन येथे आणून तिच्यावर प्रमाणित नंबर प्लेट बसून घेतल्यानंतर गाडी संबंधित अमलदाराच्या ताब्यात देण्यात आली.सदर कारवाईचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांकडून अभिनंदन करून स्वागत केले.
राहुरी पोलिसांकडून फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या पोलिसांच्याच गाडीला दंडात्मक कारवाई ; कारवाईचे पोलीस अधिकारी कर्मचारी व नागरिकांकडून कौतुक

0Share
Leave a reply