तेर प्रतिनीधी / विजय कानडे : जिल्हा परिषद अधिकारी,कर्मचारी यांचे क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी रोजी धाराशिव येथे केले होते यामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तेर येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका सुनीता माने यांनी समूह नृत्यात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे तसेच समूह गीत गायनात जिल्ह्यात प्रथम,व युगल गीत गायनात तृतीय क्रमांक पटकावला आहे त्याबद्दल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तेर यांच्या वतीने शिक्षिका सुनीता माने यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित केंद्र प्रमुख आर पी पडवळ, गोरोबा पाडूळे,बी व्ही कानडे, थोडसरे डि आर, चंदनशिवे, श्रीमती ए पी पांढरे,श्रीमती एस पी राठोड,श्रीमती एन जे अन्सारी उपस्थित होते, तसेच शिक्षिका सुनीता माने यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आल्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी व तेरसह परिसरातून कौतुक होत आहे…
Leave a reply