अणदूर प्रतिनीधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे जवळपास 25 हजार लोक वस्तीचे गाव असून शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात प्रगत म्हणून जिल्ह्यात विशेष ओळख आहे. याच गावातून जवळजवळ जिल्ह्याची राजकारण चालते. बसस्थानक ते खंडोबा मंदिर हा जवळपास दोन कोटीचा रस्त्याच्या कामाचे शुभारंभ करण्यात आला आहे. 3 फेब्रुवारी रोजी दिशा शक्ती न्यूज मध्ये विकास कामात बाधा न आणता, व्यापारी व गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन दीपक आलूरे यांनी केले होते. या बातमीचे गावभर सकारात्मक चर्चा झाली त्यातील काही निवडक प्रतिक्रिया……
गावच्या विकासात भर घालणारा किंबहुना व्यापार वृद्धीसाठी मुख्य रस्त्याचे काम निश्चितच दिशादर्शक ठरणार असून हे करीत असताना व्यापाऱ्यांचे संसार मोडणार नाही याची संबंधितानी काळजी घेतल्यास व्यापारी संघटना पूर्ण पाठिंबाशी सहकार्य करेल : प्रीतम पाटील, अध्यक्ष व्यापारी संघटना
अणदूर गावच्या विकासात भर घालणारा मुख्य रस्ताचे काम दर्जेदार व्हावे, तसेच व्यापारी वर्गांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. आमदार राणा दादांचे व दीपक दादांचे मनापासून स्वागत करतो.
शिवानंद मुडके, इलेक्ट्रिक दुकानदार..देशात आणि व राज्यात विकास पर्वा ला सुरुवात झाली असून आमदार राणा दादांच्या नेतृत्वाखाली गावचा चेहरा मोहरा बदलावा अशी अपेक्षा असून व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन रस्त्याचे काम उत्तम व्हावे व व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.
तुकाराम कांबळे, ज्यूस सेंटर चालक..सबका साथ.. सबका विकास या धोरणाप्रमाणे गावचा निपक्ष व निस्वार्थ विकास व्हावा, सर्वांना सोबत घेऊन विकासाचा रथ पुढे नेल्यास व्यापाऱ्यांचा फायदा होईल व गावच्या विकासाला चालना मिळेल. अयुब आत्तार, हॉटेल व्यावसायिक गेल्या अनेक वर्षांपासून बसस्थानक ते खंडोबा मंदिर दोन पदरी मुख्यरस्ता व्हावा गावकऱ्यांची अपेक्षा होती, त्यामुळे पर्यटन वाढेल तसेच विद्यार्थ्यांचे गैरसोय टळेल हे स्वप्न अखेर खरे ठरले. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस दीपक दादा आलूरे यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती व प्रोत्साहन मिळेल अशी सर्वसामान्य गावकऱ्यांची अपेक्षा असून त्यास तडा लागु नये..सर्वसामान्य नागरिक, अणदूर
Leave a reply