Disha Shakti

सामाजिक

जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा तेर येथे हळदी कुंकू व महिला मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

तेर प्रतिनीधी / विजय कानडे : रथसप्तमीच्या निमित्त महिला पालक मेळावा हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला यात महिला खूप मोठ्या प्रमाणात सहभाग झाल्या होत्या सर्वप्रथम महिला पालक अश्विनी भक्ते शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व सारिका माने यांच्या हस्ते सरस्वती देवीचे पूजन करण्यात आले व सर्व महिलांना हळदीकुंकू व वाण ,तिळगुळ वाटप करण्यात आले.

त्यानंतर महिलांच्या मनोरंजनासाठी संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात व उखाण्यांचा कार्यक्रम घेण्यात आला. या गेम मध्ये प्रथम , द्वितीय येणाऱ्या प्रत्येक महिला पालकास वस्तुरूप बक्षीस देऊन शाळेचे मुख्याध्यापक गोरोबा पाडूळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.या कार्यक्रमास केंद्रप्रमुख आर पी पडवळ , मुख्याध्यापक गोरोबा पाडूळे ,डि आर थोडसरे ,बी व्ही कानडे ,एन जे अन्सारी ,ए पी पांढरे , यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!