Disha Shakti

सामाजिक

मोरया फाउंडेशनने हळदी-कुंकू समारंभाचे सातत्य जपले : सौ.स्नेहल खोरे

Spread the love

श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायत अत्तार : सलग ९ व्या वर्षी शहरातील महिलांसाठी रथसप्तमीच्या मुहूर्तावर हळदी-कुंकू समारंभ आयोजित करत मोरया फाउंडेशनने २ हजारच्या आसपास महिलांना एकत्रित आणून धार्मिक संस्कृतीचे जतन केल्याचे प्रतिपादन माजी नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी केले. यावेळी काढलेल्या लकी ड्रॉमध्ये ९ भाग्यवान महिलांना बक्षिसे मिळाली.

दरवर्षी रथयप्तमीच्या मुहुर्तावर होणा-या मोरया फाउंडेशनच्या ९ व्या हळदी-कुंकू समारंभानिमित्त महिलांशी संवाद साधताना सौ.स्नेहल खोरे म्हणाल्या की, जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील महिलांना एकत्रित आणत धार्मिक संस्कृती जतन करण्याचा आमचा प्रयत्न असतो. विकास कामांमध्ये सर्वाधिक विकासनिधी प्रभाग १६ मध्ये आणण्यात यश मिळाल्याने विकासात अग्रगण्य प्रभाग म्हणून थत्ते मैदान परिसराचा उल्लेख केला जातो. गेल्या ९ वर्षांपासून सामाजिक उपक्रम, नेत्र तपासणी शिबिरे, हळदी-कुंकू समारंभासह विविध उपक्रम परिसरात राबविले जातात. यापुढील काळात महिलांच्या विकासाचे धोरण राबविणार असल्याचे स्नेहल खोरेंनी सांगितले.

यावेळी उपस्थित महिलांनी भाजप सदस्य नोंदणीस उस्फुर्त प्रतिसाद दिला. मोरया फाउंडेशन आयोजित लकी ड्रॉमध्ये अनुक्रमे पूनम नरोडे, सलोनी मुथा, जयश्री मांडगे या पहिल्या तीन भाग्यवान विजेत्या ठरल्या. तर पूजा हेंद्रे, रुपाली लाटणे, मयुरी अस्वले, जयश्री काळे, मीना खाजेकर, सरला धीवर तर फत्तूभाई सय्यद, रवी बोर्डे, अनिता वाडेकर यांच्या ऑर्केस्ट्रोने जुन्या-नवीन गाण्यांची मैफील सजवली. हळदी-कुंकू समारंभाचे प्रभावती लगड, सीमा पटारे, श्रीमती शिला खोरे, संगीता पंडित, अनिता गोरे, अनिता पाटील, विद्या पाटील, वर्षा भोईर, मनिषा बर्डे, सविता घोडेकर, रेखा होते, नुतन माळवे, कुणाल दहिटे, संकेत नागरे, गौरव करपे, आरती खाजेकर, खुशी पटारे, शौर्यजा खोरे आदींनी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे नियोजन केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!