Disha Shakti

क्राईम

ब्राम्हणी येथील मुळा अँग्रो दुध डेअरीची रक्कम लुटणाऱ्या टोळीतील चौथा आरोपी २ महिन्यांनंतर स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

Spread the love

राहुरी प्रतिनीधी / ज्ञानेश्वर सुरशे : प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी अनिल मुरलीधर बनसोडे, वय ५१, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी हे दिनांक ३०/१२/२०२४ रोजी मुळा अॅग्रो प्रोडक्ट लि. ब्राम्हणी, ता. राहुरी या कंपनीचे १७,००,०००/- रूपये रोख रक्कम ही बँकेमध्ये भरणा करण्यासाठी साक्षीदारासह कारमधुन जात असताना यातील अज्ञात चार आरोपीतांनी काळ्या रंगाचे किया कार आडवी लावली. दोन आरोपीतांनी गज व टॉमीने फिर्यादी असलेल्या फोर्ड कारच्या काचा फोडून, साक्षीदार यांना टॉमीने मारहाण करून त्यांचेजवळील रोख रक्कम असलेली बॅग जबरीने घेऊन गेले. याबाबत राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. १३१३/२०२४ वीएनएस कलम ३०९ (६) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाकडून नमूद गुन्हयांत यापुर्वी १) सचिन राजेंद्र वायदंडे, २) शुभम मनोज गुळसकर ३) अभिषेक लक्ष्मण जाधव असे आरोपी मुद्देमालासह राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर केले होते. नमूद गुन्हयातील इतर आरोपी हे गुन्हा केलेपासुन फरार झालेले होते. मा. पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना गुन्हयातील पाहिजे आरोपीचा शोध घेऊन, कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. त्यानुषंगाने पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार संदीप पवार, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, आकाश काळे, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड व उमाकांत गावडे अशाचे पथक तयार करुन गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथके रवाना केले.

दिनांक ०८/०२/२०२५ रोजी पथक राहुरी पोलीस स्टेशन गुरनं १३१३/२०२४ बीएनएस कलम ३०९ (६) या गुन्हयातील निष्पन्न आरोपीचा शोध असताना तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे निष्पन्न आरोपी नामे ऋषीकेश उर्फ पप्पु कुसळकर, रा.नाशिक हा पुणे येथे असल्याची माहिती मिळाली. तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे पथकाने पुणे येथे जाऊन निष्पन्न आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्यास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) ऋषीकेश उर्फ पप्पु अनिल कुसळकर, वय २१, रा. राजलक्ष्मी निवास, बाळकृष्ण नगर, पेठ रोड, पंचवटी नाशिक असे असल्याचे सांगीतले. ताब्यातील आरोपीकडे गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार २) अमोल शिंदे, रा. नागापूर, एमआयडीसी, अहिल्यानगर ३) मोहन सुरेश लष्करे, रा. नेवासा, ता. नेवासा ४) प्रतिक जाधव, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी ५) सचिन वायदंडे, रा.नागपूर, एमआयडीसी, अहिल्यानगर ६) शुभम गुळसकर, रा. वोल्हेगाव, एमआयडीसी, अहिल्यानगर ७) अभिषेक जाधव, रा.एमआयडीसी, नवनागापूर, अहिल्यानगर अशांनी मिळून प्लॅन करून केला असल्याची माहिती सांगीतली.

पथकाने ताब्यातील आरोपीकडे गुन्हयांत वापरलेल्या वाहनाबाबत व चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हयांत वापरलेली किया कार ही ८) कृष्णा पुनमसिंग परदेशी, रा. नेवासा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर याची असल्याचे सांगीतले. ताब्यातील पाहिजे आरोपी ऋषीकेश उर्फ पप्पु अनिल कुसळकर, वय २१, रा. राजलक्ष्मी निवास, बाळकृष्ण नगर, पेठ रोड, पंचवटी नाशिक यास गुन्हयाचे तपासकामी राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून, गुन्हयांचा पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!