राहूरी प्रतिनिधी / आर.आर.जाधव : राहुरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ विजय मकासरे यांच्या वर दाखल करण्यात आलेले गंभीर व संशयास्पद गुन्ह्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे साहेब यांनी नाशिक येथे सर्व पक्षीय व विविध सामाजिक संघटनांनाचा पदाधिकारी यांना दिले. राहुरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ विजय मकासरे यांच्यावर एकाच महिलेने एका दिवसात वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांची नोंद केली दिनांक ३/२/२०२५ रोजी डॉ मकासरे यांचा विवो कंपनीचा मोबाईल वळण येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात हिसकावण्यात आला होता.
या प्रकरणी त्यांनी तातडीने राहुरी पोलीस स्टेशन येथे येऊन गुन्ह्याची नोंद केली परंतु गुन्ह्यातील काही मजकूर पोलीस ठाणे अंमलदार यांनी वगळला. व त्यानंतर काहीवेळाने डॉक्टर मकासरे यांचा मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपीच्या पत्नीने राहुरी पोलीस स्टेशन येथे त्यांचे चार ग्राम चे मंगळसूत्र डॉक्टर विजय मकासरे यांनी हिसकाऊन घेतल्याची फिर्याद दाखल केली.
यात विशेष म्हणजे डॉ मकासरे यांनी फिर्यादी मध्ये नमूद केलेली वेळ व त्या महिलेच्या फिर्यादी चे वेळ ही एकच असल्यामुळे तक्रारी बाबत शंका व्यक्त केली जातं आहे. व त्यांनतर त्याच दिवशी म्हणजे तीन फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजे दरम्यान डॉ मकासरे यांच्यावर पोस्को सह गंभीर गुन्ह्याची पुन्हा नोंद करण्यात आली त्यामुळे या प्रक्रिये मध्ये कोणीतरी या घटना पोलीस स्टेशन ला नोंदविण्यास सहकार्य करत असल्याचे राहुरी तालुक्यातील विविध सामाजिक व राजकीय संघटनाच्या पादाधिकारी यांच्या लक्षात आल्या मुळे रिपाई आठवले गट. भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन. सत्य शोधक लहुजी क्रांती सेना. शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट रिपाई कवाडे गट.भारिप. रिपाई गवई गट. बहुजन युथ पँथर. महादेव कोळी संघटना. रिपब्लिकन युवा सेना, वंचित बहुजन आघाडी. राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन. या सर्व संघटनाच्या पदाधिकारी यांनी तातडीने बैठक घेऊन संबंधितांना प्रकरणाला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला
तसेच या विविध संघटनानी त्यांच्या वतीने स्वतंत्र निवेदन करून नाशिक परीक्षेत्र विशेष पोलीस निरीक्षक माननीय दत्तात्रय कराळे साहेबांची दिनांक सात फेब्रुवारी रोजी नाशिक येथे समक्ष भेट घेऊन डॉ विजय मकासरे यांच्यावर एकाच दिवशी गंभीर स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्यात आली तसेच हा गुन्हा दाखल करते वेळी डी वाय एस पी डॉ बसवराज शिवपुजे साहेब व एक प्रशिक्षनार्थी आय पी एस अधिकारी राहुरी पोलीस स्टेशनला हजर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होतं आहे.
डॉ मकासरे यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे याबाबत चौकशी मागणी तसेच पोलीस अधीक्षक साहेबांच्या विरोधात चौकशी च्या तक्रारी व न्यायालयात अट्रॉसिटी गुन्हा नोंद करण्यासाठी केसेस दाखल केलेल्या होत्या त्याच केसेस बाबतीत डॉ मकासरे यांना कोर्टात तारीख असल्याच्या दिवशीच त्यांचा मोबाईल हिसकावून नेला जो मोबाईल हिसकावून नेला त्याच मोबाईल मध्ये अनेक पुरावे होते.अशी सर्व माहिती माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांना देण्यात आली.
डॉ. दर्जाचा व्यक्ती चार ग्राम सोन्याची चोरी करू शकतो व अल्पवयीन मुलीची छेड काढु शकतो का या सर्व घटना संशयास्पद असल्याचे महानिरीक्षक साहेब यांना निदर्शनात आणून दिल्यानंतर त्यांनी मला दहा दिवस द्या मी या प्रकरणी लक्ष घालून व सत्यता पडताळून कुणावर अन्याय होऊ देणारे नाही असे आश्वासन दिले तसेच राहुरी तालुक्यातील गोर गरीब जनतेच्या दखलपात्र फिर्यादिच्या नोंदी केल्या जातं नाही त्यामुळे राहुरी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षमतेवर कारवाई ची मागणी या संघटनानी केली.
या प्रकरणी प्रवीण लोखंडे, विलास नाना साळवे, कांतीलाल जगधने, पिंटू नाना साळवे, आप्पासाहेब मकासरे, नंदूभाऊ शिंदे.भाऊसाहेब पगारे. बाबा साठे. सुनील पवार.दत्तात्रय जोगदंड.दिनेश गायकवाड, सुनील चांदणे, चंद्रकांत जगधणे, तुषार दिवे, योगेश पवार, हर्षद साळवे, निलेश शिरसाठ, यमुनाताई भालेराव, दिपक साळवे या संघटनाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन सादर करून चौकशी करून डॉ मकासरे. यांच्यावर दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यात यावेत अशी मागणी कारण्यात आली आहे.
डॉ. विजय मकासरे यांच्यावर दाखल गंभीर व संशयास्पद गुन्ह्याची होणार उच्चस्तरीय चौकशी ; पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे साहेबांचे आश्वासन

0Share
Leave a reply