राहुरी प्रतिनीधी / ज्ञानेश्वर सुरशे : गेली अनेक वर्षापासून कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला असून गेली पंचवार्षिक फोडाफोडी व तोंडातोडीतच गेली.चालू पंचवार्षिक निवडणुकीवेळी महायुतीने शेतकऱ्यांची कर्जमाफीची केलेली घोषणा त्वरित पूर्ण करावी आता शेतकरी वर्गाचा जास्त अंत पाहू नये अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष शेतकरी नेते-सुरेशराव लांबे पाटील यांनी केली.
पुढे बोलताना लांबे पाटील म्हणाले की चालू वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने फेब्रुवारी महिन्यातच विहीर व बोअर वेलचे पाणी संपुष्टात आले असून शेतीमालाला हमीभाव नसल्यामुळे गेली अनेक वर्षा पासून शेतकरी वर्ग अडचणीत आलेला आहे.शेतीसाठी सोसायटी बँक व पतसंस्था यांचे काढलेले कर्ज त्यांना भरणे शक्य झाले नाही.त्याची नाडी ओळखून चालू निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा करून शेतकरी वर्गांचे मते मिळवली त्यामुळेच महायुतीची एक हाती सत्ता आली.
सरकार स्थापन होऊन जवळपास तिसरा महिना उलटत आला तरी महायुती सरकार शेतकऱ्यांच्या या ज्वलंत मागणीकडे दुर्लक्ष करून राजकारण करत आहेत.मुख्यमंत्र्यांनी आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. व शेतकऱ्यांची त्वरित सरसकट कर्जमाफी करून त्यांना नवीन कर्ज पुरवठा करावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी केली.
महायुती सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये त्वरित सरसकट कर्जमाफी करावी-सुरेशराव लांबे पाटील

0Share
Leave a reply