Disha Shakti

इतर

नायगाव तालुक्यांतील आठ परीक्षा केंद्रावर बोर्डाचा बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर पडला पार ;  परीक्षा केंद्रावर आठ बैठे पथक तर एका भरारी पथकाचा समावेश

Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ मिलींद बच्छाव : राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा दिनांक 11 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली आहे. 18 मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेसाठी राज्यभरातून 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात 8 लाख 10 हजार 348 मुले, तर 6 लाख 94 हजार 652 मुलींचा समावेश आहे. 37 तृतीयपंथी विद्यार्थीही यंदा परीक्षा देतील. राज्यातील 3 हजार 373 केंद्रांची सोय त्यासाठी केली आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा 10 दिवस आधी परीक्षा सुरू होत आहे. त्यामुळे निकालही लवकर म्हणजेच 15 मेपर्यंत लागण्याची शक्यता असल्याचे शिक्षण मंडळाने वरतीवले आहे. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक केली आहे. कॉपीमुक्तीसाठी परीक्षा केंद्रावर ड्रोनची नजर असेल. केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षकांची फेस रीडिंगद्वारे तपासणी केली गेली.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात विवीध आठ परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी चार हजार सतरा परीक्षा फ्रॉम भरला असून त्यातील चार हजार एकोनपन्नास विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाचा पेपर दिला . यासाठी नायगाव शिक्षण विभागामार्फत 8 बैठे पथकाची केली तर भरारी पथका मध्ये श्रीमती. क्रांती डोंबे (उपविभागीय अधिकारी बिलोली), श्रीमती. डॉ. धम्मप्रिया गायकवाड ( तहसिलदार नायगाव) श्री. संग्राम कांबळे (गट शिक्षणाधिकारी नायगाव) यांनी पोस्ट बेसिक जुनियर कॉलेज मरवाळी तांडा, जनता जुनिअर कॉलेज नायगाव बाजार, वि. जा. भ. ज्यु. कॉलेज, कुंटुर तांडा, ज. ने. विं. बरबडा इत्यादी परीक्षा केंद्रावर भेट दिली.

10 वी, 12 वी परीक्षा केंद्राच्या परिसरात 163 कलम जारी

नांदेड जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा माहे फेब्रुवारी, मार्च, 2025 मध्ये होत असून परीक्षा केंद्र परीसरात कलम 163 जारी सदर परीक्षा केंद्राचे 100 मीटर परीसरात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आदेश निर्गमित करुन भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 जारी केली आहे. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

उच्चस्थतर शिक्षा विभागाच्यावतीने आयोजित युजीसी नेट परीक्षांचे संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 जारी करण्यात आले आहे. सदर कलम अंतर्गत दि.16 जानेवारी 2025 पर्यंत परीक्षेच्या सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत परीक्षा केंद्र परीसरात 100 मीटर परीसरात दोन अथवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या जमावावर आणि सदर परीक्षा केंद्राचे परीसरात झेरॉक्स, मोबाईल, एसटीडी, आयएसडी, फॅक्स, संगणक, ई-मेल, इंटरनेट इत्यादी ईलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व ईलेक्ट्रॉनिक्स सुविधांचे वापरावर व परीक्षा केंद्र जवळील 100 मीटर परीसरातील असे केंद्र सुरु ठेवण्यावर निर्बंध व प्रतिबंध राहणार आहे.
सदर प्रतिबंधात्मक आदेश परिक्षेकरीता नियुक्त अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षक, पोलीस अधिकारी, कर्मचारी व परीक्षेशी निगडीत अधिकारी व कर्मचारी आणि परीक्षार्थी यांना लागू असणार नाही. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!