Disha Shakti

शिक्षण विषयी

ब्राईट फ्युचर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

Spread the love

इंदापूर प्रतिनीधी / प्रवीण वाघमोडे : दि.११ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य बोर्ड यांचे बारावीच्या परीक्षा चालू झाल्या असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यातर्फे यावर्षी कॉपीमुक्त परीक्षा हा उपक्रम राबवण्यात येत आहे याचे औचित्य साधून खडकी येथील बारावी परीक्षा केंद्र ब्राईट फ्युचर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्यु.कॉलेज खडकी या केंद्रावर परीक्षेसाठी प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळी गुलाब पुष्प देऊन त्यांचे परीक्षेसाठी स्वागत व शुभेच्छा देण्यात आल्या . संस्थेला या वर्षी प्रथमच एच एच सी परीक्षा केंद्र मिळाले असून केंद्रावर एकूण २६७ विद्यार्थी या वर्षी पेपर देणार आहे. परीक्षा केंद्र असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

१२ वी एच.एस सी परीक्षेचे परीक्षा केंद्र असल्याने विद्यार्थ्यांची होणारी धावपळ व तणाव कमी होईल तसेच विभागीय बोर्ड ने दिलेल्या सर्व अटी व शर्थिंना अधीन राहून च परीक्षा केंद्र चालू राहील अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री.राजू गायकवाड सर यांनी दिली.यावेळी संस्थेचे सचिव ऋषिकेश गायकवाड सर खजिनदार तुषार काळे सर ,केंद्रसंचालक सिंधू यादव मॅडम,उपकेंद्र प्रमुख योगेश हगारे सर ,सर्व पर्यवेक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!