इंदापूर प्रतिनीधी / प्रवीण वाघमोडे : भिगवण ग्रामपंचायत सरपंचांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच पद रिक्त झाले होते त्याचे निवडणूक आज पार पडली भिगवण ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध होईल असे असताना अचानकपणे सरपंच पदासाठी दुसरा एक अर्ज दाखल झाला व सत्ताधारी पक्षाचे 16 व विरोधी पक्षाचे एकच सदस्य असताना सत्ताधारी पॅनलचे गुरप्पा पवार यांना 12 व निर्मला पांढरे यांना 5 एवढी मते पडली. भिगवण गावच्या सरपंचपदी गुराप्पा गंगाराम पवार यांची निवड झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी दीपक कोकरे यांनी दिली. गुप्त पद्धतीने घेण्यात आलेल्या निवडणुकीत गुराप्पा गंगाराम पवार यांना १२, तर श्रीमती निर्मला हरिचंद्र पांढरे यांना ५ मते मिळाली. या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून दीपक कोकरे, तसेच तलाठी राहुल देवकर आणि ग्रामपंचायत अधिकारी भगीरथ परदेशी यांनी कामकाज पाहिले.
इंदापूर तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायतमध्ये कुंची कोरवी समाजाचा महाराष्ट्रातील पहिला सरपंच होण्याचा मान गुरप्पा पवार यांनी मिळविला आहे. त्याप्रमाणे ३ सदस्यांना सरपंच पदाचा, तर ३ तीन सदस्यांना उपसरपंच पद देण्याचा शब्द देण्यात आला होता.
विरोधातील चार मते कोणाची?
आजची निवडणूक बिनविरोध होणार, हे जवळपास निश्चित असताना सरपंच पदासाठी दुसरा अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे निवडणूक घेण्यात आली. यामध्ये सत्तेतील पॅनलकडे १६ आणि विरोधातील पॅनलकडे एकच मत होते. अशातच सत्ताधारी चार सदस्यांनी आपली मते विरोधात टाकल्याने आश्यर्य व्यक्त केले जात आहे. नवनियुक्त सरपंच गुराप्पा पवार यांनी आभार व्यक्त केले.
Leave a reply