Disha Shakti

इतर

कृषि विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉ. नारायण मुसमाडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी सौ. माधुरी औताडे यांची निवड

Spread the love

राहुरी विद्यापीठ / आर. आर. जाधव : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कृषि विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदांच्या निवडीसाठी राहुरीचे सहाय्यक निबंधक दिपक पराये यांचे उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्वानुमते चेअरमनपदी डॉ. नारायण मुसमाडे तर व्हाईस चेअरमनपदी सौ. माधुरी औताडे यांची निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. विक्रम कड, दत्तात्रय कदम, गणेश मेहेत्रे, योगेश भिंगारदे, महेश घाडगे, आप्पासाहेब चोपडे, भारती बरे तसेच पतसंस्थेचे कर्मचारी व सभासद उपस्थित होते. कृषि विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्था मर्या. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी ही जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नावाजलेली पतसंस्था असून या पतसंस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या सभासदांची आर्थिक उन्नती साधण्यामध्ये मोठा वाटा आहे.

या पतसंस्थेच्या वाटचालीमध्ये सर्व आजी व माजी संचालकांचा आणि सभासदांचा मोलाचा वाटा आहे. नुकतीच झालेली पतसंस्थेच्या चेअरमन आणि व्हॉइस चेअरमन पदाची निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. पदाधिकार्यांच्या या निवडीबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के व कुलसचिव डॉ. नितीन दानवले यांनी त्यांचे अभिनंदन केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!