श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यांतर्गत (महिन्यातील सर्वोच्च कामगिरी करणारे पोलीस )’टॉप कॉप ऑफ द मंथ’ ही योजना जानेवारी २०२५ पासून सुरू करण्यात आली असून यामध्ये श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक अनिल शेंगाळे, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिन्द्र शेलार, राहुरी पोलीस स्टेशनचे सहायक फौंजदार तुळशीराम गिते यांनी महिनाभरात उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या संकल्पनेतून आणि पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमात वरील पोलिसांनी त्यांच्या सेवेची जबाबदारी चोख पार पाडत उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांची निवड करण्यात आली.उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे आणि प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी रॉबिन बंसल यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.मातुलठाण – नायगाव नदीक्षेत्रातील भागात वाळू माफियावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागवर वाळू माफियानीं जीवघेणा हल्ला केला असता श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक अनिल शेंगाळे हे या जीवघेण्या हल्ल्यात घुसून स्वतः जखमी झाले असता तरीही त्यांनी जमाव पांगवून स्वतः जीवघेण्या हल्याचा विचार न करता कारवाई करत आपली जबाबदारी पार पाडली.
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल मच्छिन्द्र शेलार यांनी कन्नड भाषा असलेल्या रस्ता चुकलेल्या असह्य महिलेला सुरक्षित रित्या कुटुंबाच्या स्वाधीन केले तसेच राहुरी पोलीस स्टेशन मधील सहाय्यक फौंजदार तुळशीराम गिते यांनी प्रलंबित गुन्ह्यातील आरोपीकडून चोरीस गेलेला माल हस्तगत केला.या सन्मानाबद्दल श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, श्रीरामपूर ग्रामीण पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी याच्यासह शहर व ग्रामीण पोलीस कर्मचारी यांनी अभिनंदन करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात श्रीरामपूर व राहुरी येथील पोलीस सन्मानित, पोलिस नाईक अनिल शेंगाळे,पो.हे.कॉ शेलार, सहा. फौंजदार गिते पुरस्काराने सन्मानित

0Share
Leave a reply