Disha Shakti

सामाजिक

नळदुर्ग येथील राज जगदाळे यांची महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेत प्रकल्प अधिकारी पदावर नियुक्ती

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : नळदुर्ग येथील जेष्ठ पत्रकार व कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. दिपक तुळशिदास जगदाळे यांचे चिरंजीव राज दिपक जगदाळे यांची महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) येथे प्रकल्प अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. राज दिपक जगदाळे यांच्या यशामागे त्याचे मार्गदर्शक आदरणीय श्री.सतीश पाटील सर, सौ. लताताई सतीशराव पाटील, प्रितम पाटील, शुभम सुरवसे व त्यांचे आई वडील यांचा सिंहाचा वाटा आहे. राज दिपक जगदाळे यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी ) पुणे यांचे विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे नुकताच पदभार स्विकारला आहे.

राजच्या या यशामागे प्रामुख्याने आदरणीय श्री.सतीश पाटील सर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.लताताई सतिश पाटील यांचा आशिर्वाद तर आहेच शिवाय त्यांच्याच प्रयत्नामुळे व मार्गदर्शनामुळे राज आज या प्रकल्प अधिकारी पदावर जाऊ शकला असे मत राजच्या आई वडिलांनी व्यक्त केले.राज जगदाळे यांच्या या नियुक्ती बद्दल त्याच्या मित्रांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला तसेच नळदुर्ग व परिसरातील लोकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!