Disha Shakti

शिक्षण विषयी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सडे, महादेव वस्ती व न्यू इंग्लिश स्कूल सडे यांच्या संयुक्त विद्यमाने सडे येथे वार्षिक स्नेह सम्मेलन उत्साहात संपन्न

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील सडे येथे दि.18 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेव वस्ती, न्यू इंग्लिश स्कूल सडे या तीन शाळांचे तसेच गावातील चार अंगणवाड्यांचे संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमास अंगणवाडीचे चिमुकले ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने उपस्थित नागरिक भारावून गेले तसेच या संयुक्त कलारंग उत्साह कार्यक्रमास पालक व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती त्यामुळे विदयार्थ्यांचा आंनद द्विगुणित झाला होता.

या कार्यक्रमास अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षकांनी उपस्थिती दर्शविली होती तसेच सडे गावातील ग्रामस्थांनी व तरुण मंडळांनी विदयार्थ्यांच्या कला नृत्यावर बक्षीसांचा वर्षाव केला.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नाटक, देशभक्तीपर, धार्मिक, विनोदी गीतांवर बहारदार नृत्य व वेशभूषा सादरीकरण केले. या कार्यक्रमासाठी सडे गावातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती, तसेच गावातील युवा कार्यकर्ते सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या कर्यक्रमास सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच तीनही शाळांतील सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेऊन वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमास उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांनी तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!