तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : अपघातग्रस्त व्यक्तीला तातडीने मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अपघाताच्यावेळी बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा एखाद्या माणसाची, आप्ताची जबाबदारीची भूमिका पार पाडणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. हे कर्तव्य नळदुर्ग येथील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पार पडल्याची पहायला मिळाले. नळदुर्ग सोलापूर कडे जाणारा मालट्रक पुढील मालट्रकला धडकला. यावेळी धडक देणाऱ्या माल ट्रक चा ड्रायव्हर स्टेरिंग जवळ अडकून पडला होता.
याचवेळी उपजिल्हा रुग्णालय लोकार्पण सोहळा आटोपून शिवसेना शिंदे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख धाराशिव श्री ज्ञानेश्वर घोडके, शिवाजी सुरवसे नळदुर्ग शहर प्रमुख अफजल कुरेशी उपशहर प्रमुख दीपक घोडके उपशहर प्रमुख गौस कुरेशी, विधानसभा शहर संघटक खय्युम सुंबेकर उपशहर संघटक मनोज भाई मिश्रा जेस्ट शिवसैनिक. यांनी हा प्रसंग पाहिला कोणत्याही प्रकारचा विचार न करता मानवतेचे दर्शन घडवते त्यांनी या ड्रायव्हरला केबिन मधून बाहेर काढले व त्यास नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. शिवसेनेच्या नळदुर्ग येथील कार्यकर्त्यांनी दाखवलेले मानवतेचे दर्शन सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
Leave a reply