राहुरी प्रतिनिधी / आर. आर. जाधव : राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात पुणे येथील एका प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रेमात धोका देत असल्याने कोयत्याने शिर धडा वेगळे करून ही हत्या केल्याची कबुली देत सदर प्रियकर राहुरी पोलीसात हजर झाला आहे. सोनाली राजू जाधव (वय-३३) असे मृत महिलेचे नाव आहे. अधिक माहीती अशी की बुधवारी रात्री ८ वाजेच्या दरम्यान राहुरी पोलिसात सखाराम वालकोळी, वय-५८, रा.आंबेगाव, जि.पुणे, हल्ली राहणार आहिल्यानगर असे स्वतःचे नाव व पत्ता सांगत एक व्यक्ती हजर झाला व त्याने वांबोरी-डेहरे डोंगराळ भागातील महादेव मंदिर परिसराते आपल्या प्रेयसीची कोयत्याने गळा तोडून हत्या केल्याचे सांगितले. राहुरी पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता तेथे धडावेगळे शिर रक्ताच्या थारोळ्यात असेलेला मृतदेह आढळून आल्याने सगळेच हादरून गेले.
आरोपीची चौकशी केली असता त्याने सांगितले की तो पुणे येथील महानगरपालिकेत नोकरीस होता. तेथीलच विवाहित सोनालीशी त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते. दोघेही विवाहित होते.मात्र ते आपले घर-दार सोडून एकत्र राहीले व परत बाजूला गेले. त्यानंतर सखाराम हा आहिल्यानगर येथे कामानिमित्त रहायला आला होता.मात्र गेल्या काही दिवसापासून सोनाली ही सखाराम यास ब्लॅकमेल करत त्रास देत होती. त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये कायम खटके उडत होते.
गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या या प्रेमात प्रेयसी धोका देत असल्याने देखील त्यांच्यात कायम वाद होत होते. काल सायंकाळच्या दरम्यान सखारामने आपल्या प्रेयसीला तुला एक गिफ्ट द्यायचे आहे आपण बाहेर जाऊ असे सांगितले. अहिल्यानगर येथून त्याने सोनाली हिस मोटरसायकलवर डेहरे वांबोरी शिवारात असलेल्या निर्जन डोंगराळ शिवारात नेत दोन पायावर डोळे झाकून बस तुला मी आता गिफ्ट देणार आहे असे सांगितले व दोन पायावर डोळे झाकून बसल्यानंतर पाठीमागून जाऊन सखारामने त्याच्या बॅगेतील धारदार कोयता बाहेर काढत तिचे शिर धडा वेगळे करत हत्या केली.
सदर घटनेनंतर आरोपी सखारामने राहुरी पोलिसात हजर होऊन सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे व ठसे तज्ञ पथकाने भेटी दिल्या आहेत. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम पारधी, अजिनाथ पालवे, सुनील निकम, प्रमोद ढाकणे, सुरज गायकवाड, नदीम शेख, सुनील कु-हाडे, अंकुश भोसले आदी पोलीस पथकाने धाव घेत घटनेची माहीती घेतली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे करत आहे.
आरोपी सखाराम याने त्याच्या प्रेयसीला अहिल्यानगर जिल्ह्यात बोलून घेतले व मला ७० हजार रुपये मिळाले आहेत मी तुला एक गिफ्ट देणार आहे आपण बाहेर फिरायला जाऊ, असे त्याने मयत सोनालीला सांगितले. त्यानंतर सायंकाळी अहिल्यानगर येथून निघाल्याने रात्रीच्या दरम्यान डेहरे वांबोरी शिवारात निर्जन स्थळी तो आल्यानंतर त्यांनी सोनाली हिस डोळे झाकून दोन पायावर बस मी तुला गिफ्ट देणार आहे असे सांगितले. सोनाली देखील दोन पायावर डोळे झाकून बसल्यानंतर त्याने क्षणाचाही विलंब न करता आपल्या बॅगेतील धारदार कोयता काढून तिचे मुंडके उडवून हत्या केली. त्यामुळे सोनालीला गिफ्ट तर नव्हे मात्र मृत्यू नक्की मिळाला.
अनैतिक संबंधाच्या वादातुन प्रियसीच्या गळ्यावर कोयत्याने वार करून धडापासुन शिर केले वेगळे ; प्रियसीचे मुंडके तोडुन प्रियकर झाला राहूरी पोलिसात हजर

0Share
Leave a reply