राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या १२ गावांच्या सजेतील कोतवाल या संवर्गाची पदांची प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत कोतवाल निवड समितीच्या अध्यक्षतेखाली काल दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी राहुरी तहसील कार्यालयात काढण्यात आली आहे.
राहुरी तालुक्यातील १५ गावांतील सजेवर कोतवाल या संवर्गाची पदे रिक्त आहेत. मात्र, शासन निर्णय – २०२३ नुसार रिक्त पदांपैकी ८० टक्के मर्यादित पदे भरण्यास एक विशेष बाब म्हणून शासनाने १२ गावांतील कोतवाल संवर्गातील पदे भरण्यास मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काल दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राहुरी तहसील कार्यालयात कोतवाल निवड समितीच्या अध्यक्षतेखाली प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली.
या सोडतीमध्ये तालुक्यातील देसवंडी (खुला वर्ग महिला), आंबी (खुला वर्ग), म्हैसगाव (ई.डब्लू. एस), कानडगाव (एस.बी.सी), देवळाली प्रवरा (खुला वर्ग महिला), चिंचविहिरे (एस.टी), लाख (ओबीसी), खुडसरगाव (ओ.बी.सी महिला), ब्राम्हणी (एस.ई.बी. सी), पिंप्रीवळण (ओ.बी.सी.), कोंढवड (खुला वर्ग), बारागाव नांदूर (खुला वर्ग) अशा प्रवर्गनिहाय सोडती निघाल्या आहेत.
Leave a reply