विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : तालुक्यातील टाकळीढोकेश्वर पंचक्रोशीतील सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान असलेले जागृत देवस्थान ग्रामदैवत माता बनाई देवी यात्रा उत्सव कमिटीची बैठक गावच्या वेशी समोरील पारावरती नुकतीच खेळीमेळीच्या वातावरण पार पडली. यावर्षीच्या यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी शिवाजी खिलारी तर उपाध्यक्षपदी किरण उर्फ रामभाऊ तराळ याची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
टाकळी ढोकेश्वर येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बनाई देवी यात्रा गुढीपाडव्याच्या तिसऱ्या दिवशी दि.१ ते ४ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या सामाजिक व सांस्कृतिक, धार्मिक उपक्रमांसाठी नियोजन बैठकीमध्ये यात्रा कमिटीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे अध्यक्ष शिवाजी खिलारी, उपाध्यक्ष किरण तराळ, खजिनदार नारायण झावरे साहेब, गंगाधर बांडे,सह खजिनदार बाळासाहेब खिलारी, सचिव पत्रकार वसंत रांधवण, सेक्रेटरी प्रकाश इघे, सल्लागार म्हणून बाळासाहेब खिलारी, अशोकशेठ कटारिया, युवा उद्योजक राजुशेठ भंडारी, महेश पाटील, बबन हरिभाऊ बांडे तर प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार वसंत रांधवण, सदस्यपदी बबन हरिभाऊ बांडे,शरद झावरे, विलास नाईकवाडी,गोरक्ष निवडूंगे सुभाष जाधव, सोमनाथ बांडे, महेश पाटील,शिराज हवलदार, बाळकृष्ण पायमोडे, अंकुश पायमोडे, किसन धुमाळ, धोंडीभाऊ झावरे, लक्ष्मण झावरे, विक्रम झावरे यांचा समावेश आहे. यांच्यासह गावातील जेष्ठ नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या चार दिवसीय होणाऱ्या यात्रेत विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजनाचे, बैलगाडा शर्यतींचा कार्यक्रम आयोजित केला आहे. याप्रसंगी यात्रा कमिटीचे मार्गदर्शक निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी होणाऱ्या यात्रेची रूपरेषा सांगितली.
टाकळीढोकेश्वर ग्रामदैवत बनाई देवी यात्रा उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी शिवाजी खिलारी तर उपाध्यक्षपदी किरण तराळ

0Share
Leave a reply