दिशाशक्ती प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल येथे स्काऊट गाईडच्या अंतर्गत आनंद मेळावा अतिशय सुंदर रित्या साजरा करण्यात आला. आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी म.वि.प्र .संस्थेचे चिटणीस दिलीप (भावसा)दळवी,महिला संचालिका श्रीमती शालनताई सोनवणे, डॉ. प्रसाद दादा सोनवणे (बागलाण तालुका संचालक) ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुनील दादा सोनवणे, किरण सोनवणे, पंडित आबा अहिरे , किरण नांद्रे, महेंद्र सोनवणे, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिल जाधव, पालक शिक्षक संघ सदस्य सचिन देवरे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली सोनवणे यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन तसेच स्काऊट – गाईडचे निर्माते चीफ लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यात 72 विद्यार्थ्यांनी स्टॉल लावले होते. आलेल्या अतिथीनी विद्यार्थ्यांच्या स्टॉलवर जाऊन विद्यार्थ्यांच्या व्यवसायाची कला पाहिली. खरेदी विक्री करून मिळवलेला नफा किती आहे हे समजून विद्यार्थ्यांनी आपले कौशल्ये दाखवली.आपल्या प्रास्तविकातून स्काऊट गाईडचे महत्त्व सांगताना हर्षिता अहिरे म्हणाल्या, बेडन पॉवेल यांनी स्काऊट- गाईड ही चळवळ भारतात 1921 मध्ये सुरू केली.
आनंद मेळाव्यातील सर्वांचे लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे पारंपारिक साधनांपासून तयार केलेला स्वयंपाक जसे, चुलीवरच्या भाकरी, मिरचीचा ठेचा, कडी खिचडी. तसेच स्काऊट गाईडचा तंबू , चूल, छोटासा संसार, या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. सर्व आखणी सर्व शिक्षकांनी अतिशय रेखीव पद्धतीने केली होती.
सर्व प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या आनंद मेळाव्यातील व्यावसायिक कौशल्य पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.आनंद मेळाव्याचा आनंद सर्व प्रमुख पाहुणे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी घेतला. अशा पद्धतीने आनंद मेळावा संपन्न झाला. आ.अँड. नितीन ठाकरे, म.वि.प्र समाज संस्थेचे चिटणीस श्री. दिलीप (भाऊसा) दळवी, बागलाण तालुका डायरेक्टर डॉ. प्रसाद दादा सोनवणे, संचालिका शालन ताई सोनवणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल दादा सोनवणे,यांनी या सोहळ्याचे कौतुक केले.
Leave a reply