Disha Shakti

सामाजिक

शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकानी वाटचाल करावी – डॉ.शेटे जवाहर महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन जल्लोषात उद्घाटन

Spread the love

अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात शिवचरित्रकार, शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव रामचंद्र दादा आलुरे डॉ. अशोक चिंचोले ,माणिक आलुरे प्राचार्य डॉ.उमाकांत चनशेट्टी, उपप्राचार्य डॉ.मल्लिनाथ लंगडे यांच्या उपस्थितीत संस्थेचे संस्थापक सचिव शिक्षण महर्षी सि.ना . आलुरे गुरुजी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व दिपप्रजलित करून उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना,डॉ. शेटे म्हणाले की, राष्ट्रबांधणी युवकच करू शकतात. छ. शिवरायांचे आदर्श समोर ठेवून युवकांनी व्यसनमुक्त राहून अनेक क्षेत्र पादा क्रांत केले पाहिजे. जगातील सर्वात श्रेष्ठ जागा म्हणजे आई-वडिलांचे चरण आहेत .राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंनी मांडीचे सिंहासन करून बाल शिवबाला रामायण महाभारताचे गोष्टी सांगितले, संस्कार केले .पुढे चलून 32 मण सोन्याच्या सिंहासनावर शिवरायांचे शिवराज्याभिषेक करण्यात आले. अध्यक्षीय समारोप रामचंद्र आलुरे यांनी केले. या उद्घाटन समारंभास पालक, प्रतिष्ठित नागरिक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक ,शिक्षक माजी विद्यार्थी पत्रकार बांधव पंचक्रोशीतील मान्यवर व महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मल्लिनाथ बिराजदार यांनी व आभार डॉ. राजशेखर नळगे यांनी मानले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!