Disha Shakti

इतर

महापुरुषांचे विचार स्तुत्य उपक्रम करून अंगीकारणे हे अत्यंत उत्कृष्ट काम आहे – सौ अनुष्काताई भरणे

Spread the love

इंदापूर प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : 19 फेब्रुवारी 2025 रोजी, मदनवाडी येथे गिरीराज हॉस्पिटल बारामती व पद्मा क्लिनिक संचलित मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे आयोजन हर्षवर्धन ढवळे मित्रपरिवार यांनी केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष सौ अनुष्का अनिकेत भरणे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होत्या यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश बापू ढवळे, हनुमंत बंडगर, तुकाराम बंडगर, नानासाहेब बंडगर, आबासाहेब देवकाते, अण्णासो धवडे,हेमाताई माडगे, सचिन बोगावत, ॲड पांडुरंग जगताप,प्रदीप वाकसे, धनंजय थोरात, दादासाहेब थोरात, रणजीत निकम,नारायण बंडगर, सतिश बंडगर, इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी हनुमंत बंडगर, तुकाराम बंडगर, नानासाहेब बंडगर,राजाभाऊ देवकाते,सचिन बोगावत,सीमाताई काळंगे इत्यादी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना हर्षवर्धन ढवळे यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या उद्घाटक अनुष्का ताई भरणे यांनी शिवजयंतीच्या पवित्र दिवशी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.

भविष्यातील प्रत्येक सामाजिक कार्यात पाठीशी राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शिबिरात विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या, वैद्यकीय सल्ला, तसेच औषधांचे वितरण मोफत करण्यात आले.शिबिरात सहभागी होणाऱ्यांना तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली आणि काही आरोग्य समस्यांसाठी योग्य उपचार आणि सल्ला दिला. रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल अशा अनेक सामान्य आरोग्य समस्यांसाठी तपासणी करण्यात आली. याशिवाय, सर्दी, ताप, खोकला यासारख्या संसर्गजन्य आजारांच्या वेळी काय काळजी घ्यावी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरात 200 हून अधिक लोकांनी सहभाग घेतला, विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांनी याचा लाभ घेतला. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, याप्रमाणे मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन भविष्यातही करत राहण्याचा विचार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आरोग्याच्या सुसंस्कृत सेवा मिळू शकतील.स्थानिक रहिवाश्यांनी या शिबिराचे कौतुक केले असून, शिबिराच्या आयोजकांचे आणि डॉक्टरांचे आभार मानले. लोकांसाठी अशी सुविधा एक महत्त्वाची पाऊल आहे, ज्यामुळे आरोग्याच्या बाबतीत असलेल्या अडचणींवर मात केली जाऊ शकते.या शिबिरामुळे स्थानिक समाजाच्या आरोग्य विषयक जागरूकतेत वाढ झाली असून, आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या प्रकारच्या उपक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन खरेदी विक्री संघाचे संचालक विष्णुपंत देवकाते यांनी केले व आभार प्रमोद कुमार कुदळे गुरुजी यांनी मानले.कार्यक्रमाचे नियोजन संजय बंडगर, विशाल धुमाळ ,अरविंद देवकाते ,दिनेश भोईटे ,गोपाळ ढवळे ,राहुल ढवळे, अजित शिंदे,हेमंत निकम,गौरव ढवळे ,अविनाश ढवळे इत्यादी सहकाऱ्यांनी केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!