कल्याण प्रतिंनिधी ( सुभाष शेंडगे ) :- दि. 25/05/2021 रोजी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार कल्याण पूर्व, डोंबिवली पूर्व पश्चिम येथे अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली . कोविड-19 महामारीचा फायदा घेऊ पाहणार्या अनाधिकृत बांधकाम करणार्या व्यावसायिकांना महापालिकेकडून चांगलाच दणका देण्यात आला आहे.
त्याच प्रमाणे डोंबिवली पश्चिम येथील देवीचा पाडा या ठिकाणी चाळ बांधण्यासाठी तयार केलेले 20 जोते तोडण्याची धडक कारवाई एच प्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते व कर्मचारी पथकांने केली
तसेच डोंबिवली पूर्व येथील बालाजी गार्डनच्या मागे चालू असलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई जी प्रभाग क्षेत्र अधिकारी संदीप रोकडे यांनी महापालिकेचे पोलीस व कर्मचारी यांच्यासहकार्याने व एक जे सी बी चा वापर करून कारवाई केली आहे
सर्व प्रभागातील वार्ड अधिकारी यांना कोरोना कोविड संसर्ग महामारी बाबत महापालिका आयुक्त यांनी नेमून दिलेले मोकळे रस्त्यावर फिरणारे यांच्यावर अँटी जेन टेस्ट तपासणी व कोविड सेंट्रल नियंत्रण पाहणी इतर कामाचा वेळेचा अभावी झालेला जास्त ताण या मुळे प्रभागातील इतर कामाकडे वेळ नसल्याने याचा फायदा घेऊन अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांचा सुळसुळाट उठल्याने महानगर पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुशार व विभागीय उप आयुक्त अनंत कदम यांच्या मार्गदर्शनानुशार कल्याण पूर्व मधील खडगोलावली परिसरातील केलास नगर येथील बिल्डींग चे वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याचे धडक कारवाई डी प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकळं व जी प्रभाग क्षेत्र अधिकारी दीपक शिंदे यांनी संयुक्तपणे महापालिका पोलीस कर्म चारी व अतिक्रमण विरोध्दी पथकातील कर्मचारी यांच्या मदतीने धडक कारवाई करण्यात आली आहे