दिशाशक्ती प्रतिनिधी / रमेश खेमनर : शेवगाव तालुक्यातील बेलगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अमृता जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे . बेलगाव ग्रामपंचायतचे सरपंच सौ. मंगल जाधव यांनी राजीनामा दिल्याने सरपंच पदाची जागा रिक्त झाली होती . या जागेसाठी सौ. अमृता जाधव यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची सरपंचपदी निवड करण्यात आली आहे .
21 फेब्रवारी 2024 रोजी बेलगावचे उपसरपंच बंडू लोहकरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत अधिकारी सौ. सय्यद एन. ए . तसेच मंडल अधिकारी विष्णू खेडकर यांनी मासिक सभेचे आयोजन केले होते . यामध्ये रिक्त पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते परंतू या पदासाठी सौ . अमृता जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे .नवनिर्वाचित सरपंच सौ.अमृता जाधव यांचा उपस्थित पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहे .
यावेळी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विठ्ठल गायके तसेच सदस्य राजेंद्र पोपळे, सौ. गंगुबाई गायके, सौ. लक्ष्मी भारस्करर सह आदी सदस्य उपस्थित होते .यावेळी शेवगाव तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक ज्ञानदेव पोपळे, अर्जून उगले, नवनाथ जाधव, ज्ञानेश्वर जाधव, नारायण जाधव पोलिस पाटील राजेंद्र गायके, ग्रा.पं. कर्मचारी बंडू भारस्कर, अर्जून जाधव, ह .भ .प . गौतम महाराज जाधव, दत्ता साबळे, भाऊसाहेब उगले, ज्ञानेश्वर रोहकले, गणेश जाधव, भिमराव जाधव, शरद जाधव, संजय जाधव, भागवत जाधव, रामेश्वर गायके आदिंसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते .
पिंपरी अवघडची लेक बनली शेवगाव तालुक्यातील बेलगाव ग्रामपंचायतची सरपंच : अमृता जाधव (लांबे) यांची बेलगावच्या सरपंच पदी बिनविरोध निवड

0Share
Leave a reply