Disha Shakti

राजकीय

राष्ट्रीय महामार्गाची अर्धवट कामाची पाहणी करून तातडीने पूर्ण करण्याचे खा.ओमराजांचे आदेश

Spread the love

अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट कामाचे पाणी करून काम तात्काळ पूर्ण करून चिवारी पाटी, भुजबळ वस्ती, मधुशाली नगर येथील पाण्याचा वीसर्ग तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य डॉ. जितेंद्र कानडे यांनी दिली.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या रस्त्याचे पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कामासंदर्भात सूचना देऊन तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले. सोबत ठाकरे गटाचे तुळजापूर तालुका मां .अध्यक्ष बाळकृष्ण घोडके पाटील उपस्थित होते. अणदूर हे सांस्कृतिक दृष्ट्या ऐतिहासिक गाव असून असंख्य जनतेचे कुलदैवत आहे त्यामुळे भाविकांचे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, याचा विचार करून कोणाचेही अडचण होऊ नये याचे दक्षता प्रत्येकाने घेतले पाहिजे. त्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार ओम राजानी दिली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!