Disha Shakti

सामाजिक

सिंगल युज प्लास्टिक आणि कागदी कप वापरावर बंदीसाठी पत्रकार संपादक संघाचे श्रीरामपूर नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन

Spread the love

श्रीरामपुर प्रतिनिधी / इनायत अत्तार : सिंगल युज प्लास्टिक आणि कागदी कप बनवताना बंदी असलेले प्लॉस्टिक आणि बी.पी.ए. (बीस्फेनॉल Bisphenol A) वापरत असल्याने श्रीरामपूर नगरपालिका हद्दीत वापरण्यास बंदी घालावी या मागणीचे नम्र निवेदन श्रीरामपूर नगरपरिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

कोरोना कोव्हीड काळात प्रचंड मागणी असलेल्या सिंगल युज प्लास्टिक कप आता लोकांचे जीवघेणे ठरत आहेत प्लास्टिकचे मायक्रो कन असलेल्या सिंगल युज कपामध्ये अति गरम अथवा अति थंड पदार्थ पेय टाकल्यास त्यातील प्लास्टिक चे कन त्या अन्नाद्वारे आपल्या पोटात आणि नंतर ते थेट मेंदुत व रक्तात मिसळत असल्याने यातुन कॅन्सर कर्करोग ब्रेन ट्युमर व ईतर गंभीर आजार होत असल्याचे विविध वैद्यकीय अहवालांद्वारे निदर्शनास आल्याने राज्यातील विविध शहरात त्याच्या सर्रास वापरावर उत्पादनावर आणि वितरणावर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे श्रीरामपूर शहर व परिसरामध्ये बस स्टँड जवळील भागात, मुख्य चौका-चौकात मोठ्या प्रमाणात चहा कॉफि दुकाने टपरीधारक विक्रेते, हॉटेल आढळून येत असून सदर ठिकाणी चहा कॉफीची विक्री कागदी कप मध्ये करण्यात येते. चहा कॉफीचे कागदी कप बनविताना त्यामध्ये बंदी असलेले प्लॉस्टिक आणि बी.पी.ए. (बीस्फेनॉल Bisphenol A) नामक अत्यंत घातक केमिकलचा मोठ्या प्रमाणात उपयोग / वापर करून डिस्पोजेबल कप तयार केले जातात.

सदर कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रो प्लॉस्टिक वितळते आणि चहा घेतल्याने लाखो मायक्रो प्लॉस्टीकचे कण पोटात जातात ज्यामुळे हजारो-लाखो नागरिकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत आहे तसेच कर्करोग होण्याची शक्यता असल्यामुळे चहा/कॉफीच्या कागदी कपांच्या (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) यावर नगर पालिका यांच्या वतीने संबंधितांना नोटीस देऊन तसेच वापरावर बंदी घालून शहरातील होणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याच्या संभाव्य आजारांना आळा घालावा असे निवेदन देण्यात आले.

यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अस्लम बिनसाद सह सलीम खान पठाण, जयेश सावंत, रवींद्र असणे, एडवोकेट शेळके,सय्यद एजाज, मयूर पिंपळे, संदीप आसणे, कासम शेख, विजया बारसे,रियाज खान पठाण, अमोल शिरसाट,अजिंक्य पटेकर, इनायत अत्तार, राजेंद्र सूर्यवंशी, आल्ताफ शेख,अकबर शेख, कचरू लोहकरे शोएब शाह,अकिल सुनाभाई शेख, आमोल साबणे, इमरान शेख,गणेश ताकपेरे, शफिक शेख या सह जिल्ह्यातील विविध इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडियाचे पत्रकार संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!