राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : २०२४ मधील विधानसभा निवडणुक शांततेत पार पाडण्याचे आवाहन महाराष्ट्र पोलिसांसमोर होते ते लिलया पार पाडल्याबद्दल राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून कौतुक करण्यात आले आहे.यासंदर्भात राहुरी पोलिस ठाण्यात रविवारी दिनांक २३ फेब्रुवारी रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी भेट देत एकंदर राहुरी पोलिस ठाण्यातील कारभाराविषयी समाधान व्यक्त केले.
पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, अलीकडेच माहे नोव्हेंबर, २०२४ मध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आणि निकाल प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. विधानसभा निवडणूक-२०२४ या अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या झालेल्या आहेत. विधानसभा निवडणूक-२०२४ ची निवडणूक शांततेत पार पाडणे हे महाराष्ट्र पोलीस दलासाठी मोठे आव्हान होते. आपण आपल्या सोबतचे अधिकारी व अंमलदारासह आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कोणताही मोठा अनुचित प्रकार घडू न देता निवडणूकीचे कामकाज शांततेत पार पाडलेले आहे. त्यामुळे आपले व आपल्या अधिपत्याखालील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदाराचे मी अभिनंदन करतो.
या काळात निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे खुल्या व निर्भय वातावरणामध्ये निवडणूका पार पाडण्याचे आव्हान आपण निश्चीतच चांगल्या प्रकारे पेललेले आहे. याकरिता सर्वांचे अभिनंदन करत, भविष्यात देखील आपण अशीच उल्लेखनीय कामगिरी करुन महाराष्ट्र पोलीस दलाचा वारसा पूढे न्याल अशी अपेक्षा पत्रात व्यक्त केली आहे.
राहूरीचे पो.नि. संजय ठेंगे यांच्या उत्कृष्ट कार्याचे विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून कौतुक

0Share
Leave a reply