Disha Shakti

इतरराजकीय

मुंबई येथे होणाऱ्या कुऱ्हाड(प्रतिकात्मक) मोर्चाच्या सहभागी व्हावे – तालुकाध्यक्ष हनमंत बोईनवाड

Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : मुंबई येथेदिनांक 03मार्च2025 रोजी आझाद मैदान मुंबई येथे समाजाच्या नेत्या तथा रणरागिनी सौ. गीतांजली ताई कोळी यांच्या नेतृत्वाखाली शासनाने समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी व सरकारला जागे करण्यासाठी कुऱ्हाड(प्रतिकात्मक) मोर्चाच्या आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी धर्माबाद/उमरी व नायगाव तालुक्यातून हजारोंच्या संख्येने समाज बांधव व भगिनी उपस्थित रहावे असे आव्हान हनुमंत बोईनवाड कोळी महासंघ युवा तालुका अध्यक्ष नायगांव यांनी केले आहे

दि. 02 मार्च 2025 रोजी नांदेड रेल्वे स्टेशनवर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने जमावे असे आवाहन करण्यात आले आहे. देविदास तमनबोईनवाड, परलाद मदेवाड, साईनाथ बडले, पवन कुमार पुटेवाड, रमेश बोमवाड, बालाजी बोमवाड, प्रकाश गजेवाड, मोहन तुरुटवाड, सूर्यकांत पोलकमवाड शाखा नायगाव व धर्माबाद/उमरी कोळी महासंघ तालुक्याच्या वतीने असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!