Disha Shakti

इतर

नायगाव ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ.कर्मचाऱ्यांनी वाचवले शेतकऱ्यांचे प्राण

Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : दिनांक 27/ 02/2025 रोजी वेळ 10.30 वाजता दैनंदिन प्रमाणे नायगाव ग्रामीण रुग्णालयाला नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांनी नायगाव सह विविध रुग्णालयाला मंदिर समजून भेट घेत असतात याच भेटीमध्ये पाहणी करत असताना नायगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अध्यक्ष डॉ.अपर्णा पुपलवाड, यांच्या टीमचे प्रमुख डॉ.योगेश आडबलवार अतिरोग तज्ञ, तसेच श्रीकांत तोर, सिस्टर्स पल्लवी जाधव, शहापुरे मामा सह यांच्या सर्वांच्या प्रयत्नांनी शेतकरी श्रीराम नारायण कदम वय वर्ष 75 या बांधवांचे हृदय दाब झालं होता सह मोठ्या प्रमाणामध्ये प्राणाची झुंज घेत होते.

ही बाब सर्व ग्रामीण रुग्णालयातील डॉ, कर्मचाऱ्यांनी लक्षात घेऊन अति तातडीची प्रयत्न टीमने करून अखेर शेतकऱ्यांचे प्राण वाचविले आणि संबंधित शेतकरी पेशंट बांधवांना नांदेड येथे डॉक्टर शंकरराव भाऊराव चव्हाण/ सिविल हॉस्पिटल नांदेड येथे पाठवण्यात आले या ठिकाणी गजानन पाटील चव्हाण मित्रपरिवार उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!