Disha Shakti

शिक्षण विषयी

स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्थे अंतर्गत कुसेगाव येथे आरी वर्क प्रशिक्षण संपन्न

Spread the love

इंदापूर प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्थेमार्फत कुसेगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथे एक महिन्याचे आरी वर्क प्रशिक्षण राबविण्यात आले होते.या प्रशिक्षणामध्ये महिलांना बेसिक पासून प्रोफेशनल पर्यंतचे शिक्षण दिले गेले.हे प्रशिक्षण कुसेगाव ग्रामपंचायतच्या 15 वा वित्त आयोग निधी मधुन पार पडले. प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सरपंच सुप्रिया संतोष भोसले व उपसरपंच विनोद माणिक शितोळे ग्रामविकास अधिकारी सोमनाथ थोरात तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.

या प्रशिक्षणाचा उपयोग गावातील महिलांनी करून घेतला या प्रशिक्षणासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरज सोट पाटील सचिव धीरज सोट पाटील व प्रशिक्षक ज्योती औटी यांनी कष्ट घेतले व प्रशिक्षण पुर्ण केले.यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना संस्थेमार्फत प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!