मुंबई कांदिवली पश्चिम / भारत कवितके : चेंबूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाच्या २० वर्धापनदिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असल्याचे संघाचे अध्यक्ष लक्ष्मण व्हटकर यांनी कळविले आहे, रविवार दिनांक २मार्च २०२५ रोजी दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत चेंबूर पूर्व येथील स्वामी मुक्तानंद हायस्कूल चेंबूर मुंबई ७१ या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघ मुंबई यांच्या २० वर्धापनदिना निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी,स्व.शिवाजीराव ( बापू) शेंडगे यांची पुण्यतिथी,समाज बंधु भगिनी साठी स्नेहसंमेलन सोहळा, वधुवर सूचक पालक परिचय मेळावा, शब्द जादूगार प्रा.डाॅ.सुनील रुपचंद धनगर यांचे व्याख्यान, मान्यवरांचे स्वागत व सत्कार,अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे उद्घाटक विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, प्रमुख पाहुणे क्रीडा आणि अल्प संख्याक विकास मंत्री आणि प्रमुख अतिथी आमदार नारायण आबा पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार डॉ बाबासाहेब देशमुख, आमदार उत्तमराव जानकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाचे संचालक मंडळ अध्यक्ष लक्ष्मण व्हटकर, कार्याध्यक्ष पांडुरंग बंडगर, सचिव मधुकर गडदे, खजिनदार चंद्रकांत पाटील यांनी या २० वर्धापनदिना निमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांला समाजातील जास्तीत जास्त महिलांनी व पुरुषांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन केले आहे.
चेंबूर मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाच्या २० व्या वर्धापनदिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

0Share
Leave a reply