अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जवाहर महाविद्यालयामध्ये विज्ञान विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सप्रयोग व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आनंदवन मंद्रूप येथील ग्रामीण वैज्ञानिक सिद्धेश्वर म्हेत्रे हे उपस्थित होते व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उमाकांत चनशेट्टी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सेवानिवृत्त अधिकारी अरविंद लोणी, उपप्राचार्य डॉ. मल्लिनाथ लंगडे, डॉ. डी एस सूर्यवंशी, डॉ.सूर्यकांत आगलावे,डॉ. विश्वास माने डॉ.सिद्धेश्वर बाड, डॉ एस व्ही राजमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात चंद्रशेखर वेंकटरमन यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना वैज्ञानिक म्हेत्रे म्हणाले म्हणाले की, बुद्धीचा विकास होण्यासाठी विचार करण्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे. विज्ञानातून शोध घेता आले पाहिजे. सध्याच्या विज्ञान युगात विद्यार्थ्यांनी वाचन व पाठांतरासह विज्ञानातील प्रयोग स्वतः करणे, याला प्राधान्य व महत्त्व दिले पाहिजे असे सांगून उपस्थित विद्यार्थ्यांना टाकाऊ पासून शिकाऊ असे नाविण्यपूर्ण प्रयोगाचे सादरीकरण विद्यार्थ्यांच्या कृतीशील सहभागातून केले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीव दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी विज्ञान दिन आहे. एखादी वस्तू टाकण्यापूर्वी त्याचा इतर ठिकाणी वापर करता येईल का, हा विचार करणे म्हणजे विज्ञान. तुमचं घर, हे सुध्दा एक प्रयोगशाळाच आहे.त्याचे सूक्ष्मदृष्टीने अवलोकन करा.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.मल्लिनाथ लंगडे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रसन्न कंदले यांनी केले व आभार प्रा.डॉ.सोमशंकर राजमाने यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशिक्षिका श्रीमती कबाडे, श्रीमती गीते, क्रीडाशिक्षक जयहिंद पवार, सहशिक्षक वाघ यांचे विशेष सहकार्य लाभले. तर जवाहर महाविद्यालयातील प्रा डॉ मल्लिनाथ बिराजदार, प्रा. उमाकांत सलगर या प्राध्यापकांसह शुभांगी स्वामी संतोष चौधरी, नामदेव काळे, महादेव काकडे, गणेश सर्जे, अमित आलुरे, सुमित चौधरी यांचे सहकार्य लाभले.
जवाहर महाविद्यालयात विज्ञानदिनी सहप्रयोग विज्ञानाचे धडे, ग्रामीण वैज्ञानिक सिद्धेश्वर म्हेत्रे यांचे मार्गदर्शन

0Share
Leave a reply