इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी भारतरत्न डॉक्टर सी व्ही रामन यांच्या संशोधन कार्याच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन पार पडले यामध्ये १६० प्रकारच्या विविध प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष बापूराव थोरात यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी सचिव विजयभैया थोरात, खजिनदार संतोष थोरात सर, संचालिका संगीताताई थोरात, प्राचार्या वंदना थोरात तसेच आयटीआय चे प्राचार्य श्री कृष्णा मोहिते सर व स्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक आदी उपस्थित होते सध्याचे युगे आधुनिक तंत्रज्ञानाच्या असल्याने विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सौर ऊर्जेचा वापर, स्वयंचलित पथदिवे, टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ, शेती उपकरणे, हरित शेती, आधुनिक तंत्रज्ञान तसेच नवनवीन प्रकल्प सादर केले.
या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा चालना मिळण्यास मदत होईल अशी आशा सचिव विजयभैय्या थोरात त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख मिस यांनी केले हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आल्याने नागरिकांसह परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्यास गर्दी केली होती विज्ञान प्रकल्पातील सोलर ऊर्जा वापर, स्वयंचलित पथदिवे, हरित शेती उपकरणे कुतूहलचा विषय ठरले.
Leave a reply