राहुरी प्रतिनिधी / आर.आर. जाधव : राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फिर्यादी नामे अक्षय मुथा राहणार वांबोरी तालुका राहुरी यांनी फिर्याद दिली होती की त्यांना अज्ञात नंबर वरून कॉल करून 5 लाख रुपये एवढ्या रकमेची खंडणीची मागणी दिनांक 26 -4 – 2024 रोजी करण्यात आली होती . म्हणून राहुरी पोलीस स्टेशन येथे गुर क्रमांक 521/ 2024 अन्वयेदिनांक 27 -4 – 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच खंडणीच्या मागणीनंतर फिर्यादी मॉर्निंग वॉकला गेले असता आरोपी नागेश चिमाजी देवकर, शशिकांत युवराज सुखदेव, बबलू रामदास कुसमुडे, संदीप रामदास कुसमुडे यांनी चेहऱ्याला बुरखा बांधून फिर्यादीवर हमला ही केला होता.
सदर दाखल गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब ,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंगळे ,लेखणीक हवलदार आवारे ,इत्तेकार सय्यद,प्रमोद ढाकणे जालिंदर साखरे यांच्या पथकाने तंत्रशुद्ध तपास करत आरोपी नामे नागेश चिमाजी देवकर शशिकांत युवराज सुखदेव बबलू रामदास कुसमुडे संदीप रामदास कुसमुडे हे निष्पन्न करून त्यांना 28 -04 – 2024 रोजी अटक केली.
तपासा दरम्यान तपासी अधिकारी यांनी आरोपीने कट रचलेले ठिकाण ,आरोपीने फिर्यादीच्या चेहऱ्यावर मारण्यासाठी वापरला स्प्रे ज्या दुकानातून घेतला ते दुकान व दुकानदाराचे स्टेटमेंट, ज्या मोबाईल वरून फोन करून खंडणीची मागणी केली तो मोबाईल हस्तगत केला . तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पिंगळे यांनी इतरही तांत्रिक पुरावा प्राप्त करून विहित मुदतीत मान्य न्यायालयात 25 जून 2024 रोजी दोषारोपपत्र सादर केले. सदर खटला अंडर ट्रायल चालवून सरकारी पक्षाचे वतीने सरकारी वकील श्री रविंद्र गागरे , श्रीमती ठाणगे / गंधाले , निराज पर्बत यांनी कामकाज पाहिले . तर भैरवी अधिकारी म्हणून महेश शेळके व प्रशांत पवार यांनी काम पाहिले.
माननीय श्री मयूरसिंह गौतम साहेब न्यायालयाने नऊ महिन्यात 13 साक्षीदार तपासून निकाल देऊन गुन्ह्यातील आरोपी यांना भारतीय दंड विधान संहिता कलम 393 अंतर्गत तीन वर्षे व 120 ब अंतर्गत तीन वर्षे कारावासाची शिक्षा ठोटावली .
सदर खटल्यात सहा पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे व पोली स उपनिरीक्षक चारुदत खोंडे यांच्या तसेच फिर्यादी . यांची साक्ष महत्वाची ठरली. आरोपी 28 4 2024 रोजी पासून पोलीस कोठडी व तदनंतर न्यायालयीन कोठडीतच होते .
राहुरी पोलिसांच्या तपासाला यश, खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपींना माननीय न्यायालयाने ठोटावली तीन + तीन वर्षे शिक्षा

0Share
Leave a reply