सोनई प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : दिनांक 01/03/2025 रोजी 22.30 वा. स.पो.नि. विजय माळी सोनई पोलीस स्टेशन यांना गोपणीय बातमी मिळाली की, शिवतेज शिवाजी जावळे वय 30 वर्षे रा. चांदा ता. नेवासा हा त्याचे पांढरे रंगाचे वॅक्सवेगण वेंटो कार क्रमांक एम. एच 20 सी.एच 1545 मध्ये गावटी कट्टा जवळ बाळगुन विक्री करण्याच्या उद्देशाने घोडेगाव ते चांदा जाणाऱ्या रोडवर येणार असल्याची माहिती मिळाल्याने स.पो.नि. विजय माळी यांनी सोनई पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन सापळा लावुन दि. 02/03/2025 रोजी रात्री 00.20 वा. सुमारास घोडेगाव शिवारातील घोडेगाव ते चांदा जाणारे रोडवर धनगरवस्ती कडे रोडचे फाट्याजवळ एक पांढरे रंगाचे वॉक्सवेगण वेंटो कार क्रमांक एम.एच 20 सी.एच 1545 ही उभी असल्याची दिसली सदर गाडीजवळ छापा टाकण्यासाठी जात असतांना सदर सराईत आरोपीस पोलीस आल्याची चाहुल लागल्याने तो गाडीचे खाली उतरुन पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला तेव्हा तेव्हा त्यास पाठलाग करुन ताब्यात घेत असतांना त्याने झटापट करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला त्यास शिताफतीने ताब्यात घेवुन त्याची व त्याचे ताब्यात मिळुन आली आहे.
तसेच कारची झडती घेतली असता त्याचे ताब्यात खालील वर्णनाचा गावठी कट्टा, काडतुस. व कार मिळुन आली 1)50,000/- एक स्टिल बॉडी असलेला गावठी बनावटीचा कट्टा त्याचे बट वर काळे रंगाचे प्लास्टीक कव्हर असलेला जु.वा. कि.अं. 2) 350/- रु. कि.च्या सात जिवंत काडतुस त्याचे पाठिमागील बाजुस इंग्रजीमध्ये KF 7.65 असे कोरलेले असलेला जु.वा.कि.अं 3) 5,00,000/- रु.कि. एक पांढऱ्या रंगाची वॉक्सवेगण वेंटो कार नं. एम.एच 20 सी.एच 1545 जु.वा. कि.अं. एकुन 5,50,350/-00
असा वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळुन आल्याने पो.कॉ. 2815 ज्ञानेश्वर गोरक्षनाथ आघाव नेम. सोनई पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांचे विरुध्द सोनई पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. 50/2025 भारतीय न्याय संहिता कलम 132, आर्म अॅक्ट 3,5,7/25 मु.पो. अॅक्ट 37 (1), 37 (3)/135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपी यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यातील अटक आरोपी शिवतेज शिवाजी जावळे, वय 30 वर्षे, रा. चांदा, ता. नेवासा. हा सराईत गुन्हेगार असुन याचे विरुध्द अनेक गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई मा. श्री राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री वैभव कलुबर्मे सो अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर, श्री सुनील पाटील सो उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग शेवगाव, यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. विजय एस. माळी, प्रभारी अधिकारी सोनई पोलीस स्टेशन, पो.स.ई सुरज पा. मेढे, श्रेणी पो.स.ई. के.बी. राख, पो.हे.कॉ. 1596 डी.एम.गावडे , पो.कॉ. 2815 ज्ञानेश्वर आघाव, पो.कॉ. 2491 पी.ए. क्षिरसागर, सर्व नेम. सोनई पोलीस स्टेशन होम गार्ड 3103 एम.आर. शेख, होमगार्ड 4166 हुसेन सय्यद, होमगार्ड 3288 विकास बोरुडे, होमगार्ड 3513 उमेश इंगळे, होमगार्ड 3123 प्रशांत चव्हाण यांचे पथकाने केली आहे.
चांदा ते घोडेगाव जाणाऱ्या रोडवर विनापरवाना गावठी कट्टा व काडतुस विक्री साठी जवळ बाळगणाऱ्या सराईत आरोपी जेलबंद, सोनई पोलीस स्टेशनची कारवाई

0Share
Leave a reply