श्रीरामपुर प्रतिनिधी / इनायत अत्तार : शनिवार दिनांक 1 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय समाज पक्ष अहिल्यानगर उत्तर जिल्हा आढावा बैठक व पदग्रहण सोहळा संपन्न झाला. या बैठकीमध्ये नवीन कार्यकारणी निवड राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष व काशिनाथ शेवंते. प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र आणि ज्ञानेश्वर सलगर मुख्य महासचिव महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने आज अहिल्यानगर उत्तर श्रीरामपूर येथे पदग्रहण सोहळा व आढावा बैठक व्हीआयपी गेस्ट हाऊस या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळेस बैठकीस प्रमुख उपस्थिती प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य डॉ.प्रल्हाद पाटील तसेच सय्यद बाबा शेख राज्य कार्यकारणी सदस्य रासप व आशुतोष जाधव युवक आघाडी उत्तर महाराष्ट्र त्याचप्रमाणे सुवर्णाताई जराड महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र नानासाहेब झुंधारे. माजी जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर या मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाली. या बैठकीमध्ये नंदू खेमनर यांची सर्वानुमते जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
यावेळी डॉ.प्रल्हाद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपला पक्ष हा गरीबाचा पक्ष असून आपल्या गरीब कार्यकर्त्याला बळ देणे व सक्षम करणे तसेच आपल्या चौकात आपली औकात कशी वाढेल हा महत्त्वाचा संदेश राष्ट्रीय अध्यक्ष यांनी दिलेला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे. कर्जमाफी नको कारण कर्जमाफीमुळे वित्तीय संस्था तोट्यात जातात. शेतकऱ्यांना कर्ज हे अल्पग्रस्तराने किंवा बिनव्याजी कर्ज दिले पाहिजे. शेतकरी सक्षम तर देश सक्षम. वन नेशन वन एज्युकेशन. जातीनिहाय जनगणना सध्या चालू असलेल्या अतिक्रमणात विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसन बाबत सरकारकडे पाठपुरावा करणार असून राष्ट्रीय अध्यक्षांना याबाबत लक्ष देण्या कामी सुचविणार असल्याचे सांगितले.मागील कमिट्या या बरखास्त करण्यात आल्या होत्या. आज पुनर्गठण करून पक्ष व संघटना मजबूत करणे हा उद्देश ठेवून या कार्यक्रमाची आयोजन करण्यात आले आहे. असे मनोगत व्यक्त केले.
यावेळेस सय्यद बाबा शेख राज्य कार्यकारणी सदस्य यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की पश्चिम महाराष्ट्र कोकण परिसरातील निवडी झालेली असून आज अहिल्यानगर जिल्ह्यातील निवडी होत आहे. पद हे शोभेची वस्तू नसून काम करण्याची संधी आहे. आणि तुम्हाला मिळालेली संधीचे सोने कराल शोषित व वंचित समाजाला न्याय मिळवून द्याल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळेस अहिल्यानगर पदाधिकारी निवड करण्यात आली. या आढावा बैठकीस उपस्थितीत आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
Leave a reply