Disha Shakti

क्राईम

इलेक्ट्रीक मोटार चोरी करणाऱ्या आरोपीस मुद्देमाल व दुचाकीसह शनिशिंगणापुर पोलीसांनी केले जेरबंद

Spread the love

सोनई प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : दि. 01/03/2025 रोजी स. फौ. सप्तर्षी चा.पो.हे.काँ. तेलोर हे शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन हद्दीत रात्रगस्त करीत असताना 23.00 वाजताचे सुमारास कांगोणी गावचे शिवारात, सुडके महाराज मठाचे समोर, मानस हॉटेलचे पाठीमागे अरुण कारभारी शिंदे यांचे शेत गट नं. 26 मध्ये गव्हाचे शेतात असलेल्या पाणी साठवण करण्यासाठी केलेल्या शेततळ्यातील 10,000 रु. किंमतीची शेरा कंपनीची तीन एच.पी. ची सिंगल फेज इलेक्ट्रीक मोटार चोरी करण्याच्या उद्देशाने चोर आले असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी तात्काळ सपोनि शेळके सो, पोसई कारखेले, सफौ माळवे, सफौ सप्तर्षी, चापोहेकाँ तेलोरे, पोहेकाँ मोकाटे,, पोहेकाँ मुसळे, पोहेकाँ लबडे, पोकाँ ठुबे, पोकाँ पोंधे, यांनी तात्काळ पोहचुन पळुन जाणार चोरटा यास शिताफिने पकडले.

त्यावेळी त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी सुनिल दत्तात्रय चाफे रा. जळके (खुर्द) ता. नेवासा असे असल्याची माहिती समजली. तसेच त्याचा एक साथीदार नामे विशाल मुळे (पुर्ण नाव माहिती नाही) रा. जळके (खुर्द) ता. नेवासा हा फरार झाला आहे. सदर आरोपी नामे सुनिल दत्तात्रय चाफे याला पोलीस स्टेशनला आणुन त्याचेवर शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन गुरनं. 32/2025 भा.न्या.सं. कलम 303(2), 62, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर आरोपीकडुन 30,000 रु. किंमतीची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी नं. MH-20-AW-3160 असा असलेली व 10,000 रु. किंमतीची शेरा कंपनीची तीन एच.पी. ची सिंगल फेज इलेक्ट्रीक मोटार असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन पोलीस कोठडी रिमांड मध्ये असलेला आरोपी याच्याकडे अधिक विचारपुस करुन पोस्टे हद्दीतील चोरी गेलेल्या शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रीक मोटार हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

सदरची कारवाई ही मा. श्री. राकेश ओला सो, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा. श्री. वैभव कलुबर्मे सो, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, मा. श्री. सुनिल पाटील सो, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि आशिष शेळके सो, सफौ. ज्ञानेश्वर माळवे यांनी केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!