Disha Shakti

क्राईम

तू नवऱ्याला सोडून दे, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो म्हणत श्रीरामपूर येथे महिलेचा विनयभंग

Spread the love

श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर शहरात तू नवऱ्याला सोडून दे, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, असे म्हणत महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत महिलेचे पॅनकार्ड काढायचे असल्याने मनोज होरा (वय ५४) याने त्या महिलेला पॅनकार्ड काढून देतो म्हणून श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील त्याच्या ऑफिस असलेल्या बिल्डींगमध्ये बोलावले.तेथे गेल्यावर शेजारचा गाळा तुम्हाला ब्युटी पार्लरसाठी घ्या, तो मी तुम्हाला दाखवतो, असे म्हणत मनोज होरा याने त्या महिलेला गाळा दाखवायचा बहाणा करत तू मला आवडते, तुला लागेल तेवढे पैसे देतो, असे म्हणत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात ‘त्या’ महिलेने फिर्यास दिली असून पोलिसांनी मनोज होरा याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!