Disha Shakti

इतर

हरेगांव येथील साखर कारखान्याच्या पाण्याच्या टाकीत पडुन मृत झाल्या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा व चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी

Spread the love

श्रीरामपुर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील हरेगांव येथील बंद पडलेल्या साखर कारखान्याच्या पाण्याच्या टाकीत पडुन मृत झाल्या प्रकरण तसेच इतर एक जन गंभीर स्वरूपात जखमी आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्या मॅनेजर पठाण व इतर संबंधित लोकांवर कायदेशिर कार्यवाही करणे व सदोष मनुष्यवधाचा व चोरीचा गुन्हा दाखल करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूर यांच्यावतीने श्रीरामपूर पोलिसांना निवेदन देण्यात आले.

सदरील घटना अशी की बेलापूर शुगर अलाईड इंड. लि. या नावाने हरेगांव येथे इंग्रजांच्या काळापासुन साखर कारखाना आहे परंतु अनेक वर्षापासून सदर कारखाना बंद अवस्थेत असून त्यावर शासनाने प्रशासकाची नेमणूक केलेली आहे. असे असताना या ठिकाणील अनेक वस्तू (भंगार) मोठ्या प्रमाणात चोरीला गेलेल्या आहे. असे असतांना या ठीकाणी देखरेखीसाठी व कारखान्याच्या वस्तु चोरी जाऊ नये यासाठी पठाण नावाची व्यक्ती, राहणार हरेगांव असे सांगते की, याच्या देखरेखीसाठी माझी नेमणुक झालेली आहे असे गेल्या २० ते २५ वर्षापासून पठाण आडनावाची व्यक्ती हरेगांव येथील लोकांना सांगून साखर कारखाण्याच्या आवारामध्ये वावरत असतांना आढळतो व तसेच त्याठीकाणी त्या परिसरातील व्यक्ती किंवा बाहेरील व्यक्ती आल्यास तो त्यांना हाकलुन देतो व सांगत असतो की, मी या ठिकाणी मॅनेजर आहे. मला विचारल्या शिवाय आत मध्ये यायचे नाही. असे रूबाबत बोलत असतो. असे असतांना या कारखाण्यातील अनेक मौल्यवान वस्तु व इतर वस्तु सर्रासपणे चोरीला गेले आहे. म्हणजेच सदर पठाण नावाची व्यक्ती स्वतः ते साहीत्य चोरून विकत असल्याचे जाणीव होत आहे. असाच प्रकार ५ ते ६ दिवसापूर्वी घडला आहे.

घटनेचे कारण असे की, देखरीखी साठी असणाऱ्या पठाण नावाच्या व्यक्तीने कारखाण्याचे काही भंगार विकायचे आहे. असे सांगुन अशोकनगर येथील मुन्ना सय्यद याला भंगार घेण्यासाठी बोलावले म्हणुन रईस सय्यद व त्याचे कामगार रूपेश कसबे व इतर ५ ते ६ जण त्या ठिकाणी येऊन कारखाण्याचे भंगार काढण्यात सुरूवात केली व तेथेच असलेली पाण्याची टाकीचे भंगार लोखंड काढत असतांना लोखंडी पाण्याची टाकी ५००० टनाची टाकी पडल्याने रूपेश कसबे या व्यक्तीचा जागीच मृत्यु झाला व भंगार घेणारा सय्यद नावाचा ठेकेदाराचा देखील अपघात होऊन जखमी झालेला आहे. या घडलेल्या सर्व घटनेची परिसरातील नागरीकांकडुन माहीती घेतली असता अनेक नागरीकांनी सांगीतले की या कारखाण्याची देखरेख करणाऱ्या पठाण नावाची व्यक्ती या ठिकाणी मनमानी पध्दतीने काम करत असतो व याला शासनाने कामावर ठेवला नाही. असे अनेकांनी सांगितले आहे व हा स्वयंघोशीत मॅनेजर आहे हाच पठाण नावाचा व्यक्ती भंगार व विविध प्रकारचे झाडे व फळे, इतर मौल्यवान वस्तु विकत असतो असे अनेक नागरीकांनी माहीती दिली. कारखाण्याचे मौल्यवान वस्तु शासनाच्या विना परवाना विकुन स्वतःचे खिसे भरणारा व रूपेश कसबे या तरूणाच्या मृत्युला कारणीभुत ठरलेल्या या पठाण नावच्या व्यक्तीवर मनुष्य वधाचा व शासकीय मालमत्तेची चोरी करून विकणाऱ्या या भामट्या पठाण वर कठोर कार्यवाही करण्यात यावी व आजपर्यंत चोरी करून माल विकून कमवलेल्या पैश्यातून श्रीरामपूर, शिर्डी व इतर ठिकाणी त्याच्या व त्याच्या घूरातील व्यक्तीच्या नावावर असलेल्या मालम्तेची चौकशी करून सर्व मालमत्ता शासनाने ताब्यात घ्यावी. व तसेच मैनेजर पठाण व भंगार घेणारा सय्यद ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवादाच्या व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा

आमच्या निवेदनाची दखल घेऊन येत्या चार ते पाच दिवसामध्ये सखोल चौकशी करून संबंधीत व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतिने आपल्या कार्यालया समोर विविध स्वरूपाचे तिव्र अंदोलन करण्यात येईल अंदोलना प्रसंगी काही अनुचीत प्रकार घडल्यास आपण स्वतः जबाबदार रहाल याची नोंद घ्यावी. असे पत्रात नमूद केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!