Disha Shakti

इतर

राहुरी येथे धनगर समाज बांधवांकडून भोकरदन घटनेचा प्रशासनाला निवेदन देऊन निषेध

Spread the love

राहूरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे कैलास बोऱ्हाडे या तरुणावर अतिशय क्रूरपणे जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी काल दि. ७ मार्च रोजी राहुरी येथील धनगर समाजाच्यावतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.कैलास बोऱ्हाडे हा तरुण जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अन्वा या गावातील रहिवाशी आहे. काही दिवसांपूर्वी तो त्यांच्या गावातील महादेव मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असताना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्याला रस्त्यात अडवून त्याला अर्धनग्न करण्यात आले. त्यानंतर त्याला लोखंडी सळई गरम करून निर्दयीपणे चटके देण्यात आले. त्याच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आला.

या घटनेच्या निषेधार्थ राहुरी येथील समस्थ धनगर समाज आज दि. ७ मार्च २०२५ रोजी एकत्र आला. आणि पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आले. कैलास बोऱ्हाडे या तरुणावर अत्याचार करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी धनगर समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली.यावेळी विजय तमनर, ज्ञानेश्वर बाचकर, भारत मतकर, दत्तात्रय खेडेकर, गोविंद तमनर, दत्तात्रय बाचकर, बापू तमनर, सोमनाथ बाचकर, किरण बाचकर, प्रवीण जारे, अनिल डोलनर, बापू पिसाळ, अक्षय शेरमाळे, कैलास केसकर आदि समाज बांधव उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!