Disha Shakti

सामाजिक

स्व.ठक्करवाड यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त व्याख्यानमाला व देहदानाचा संकल्प केलेल्या कुटुंबाचा सन्मान

Spread the love

बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार कासराळीकर : बिलोली देगलूर विधानसभेचे माजी आमदार स्वर्गीय गंगाराम ठक्करवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त महिला दिनाचे औचित्य साधून व्याख्यानमालेचे आयोजन लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या प्रांगणामध्ये करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी सुप्रसिद्ध व्याख्याते शांभवी प्रवीण साले नांदेड एज्युकेशन सोसायटी संचालन समिती सदस्या यांचे सद्यस्थितीतील स्त्रिया पुढील आव्हाने या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रथिमेस तसेच देगलूर विधानसभेचे लोकप्रिय माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून दीप प्रज्वलन करून व्याख्यान मालेस सुरुवात करण्यात आली. प्रमुख उपस्थिती श्रीगणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड विलासराव कुलकर्णी सर, कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ.रेखाताई ठक्करवाड माजी सभापती प.स.बिलोली, श्रीगणेश शिक्षण संस्थेचे सहसचिव अरविंद ठक्करवाड, सौ.स्मिताताई अरविंद ठक्करवाड, प्रमुख अतिथी सौ.कविता संभाजी टोम्पे सरपंच कासराळी,सौ.कल्पना माधव दंत्तापले उपसरपंच कासराळी, डॉ प्रियंका तुडमे, मुख्याध्यापक विनोद नरगुलवार सर तसेच कार्यक्रमाचे विशेष आकर्षण मृत्यूनंतर देहदान करण्याचा संकल्प केलेले आरळी येथील स्वाध्याय परिवारातील शेतीनिष्ठ शेतकरी संपूर्ण गुलाडे कुटूबांचे मोहनराव गुलाडे,रंजिता गुलाडे, रामेश्वर गुलाडे त्यांनी मृत्यूनंतर देह दानाचा संकल्प केला आहे.

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसभेला नांदेड येथील शंकराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीर रचना विभागाकडे संमतीपत्र सुपूर्द केले यांचा सन्मान करण्यात आला.सर्व स्तरातून गुलाडे कुटुंबाचे कौतुक होत आहे. यावेळी उपस्थित सर्व अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर विद्यार्थिनी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार गावातील महिला, विद्यार्थी, शिक्षक, शिककेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!