Disha Shakti

क्राईम

शिर्डी हादरली! मुलानेच केली वडिलांची निर्घृण हत्या, मुलाच्या मारहाणीत दत्तात्रय गोंदकर यांचा मृत्यू, शवविच्छेदन अहवालातून घटना उघडकीस

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : शिर्डी शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, मुलानेच वडिलांची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घरगुती वादातून मुलाने वडिलांना लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. या मारहाणीत 54 वर्षीय दत्तात्रेय शंकर गोंदकर यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालातून हा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट होताच, शिर्डी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. या घटनेत आरोपी मुलगा शुभम गोंदकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही घटना 6 मार्च रोजी घडली होती, मात्र तब्बल पाच दिवसांनंतर हा प्रकार उघड झाला. सुरुवातीला हा अकस्मात मृत्यू म्हणून सादर करण्याचा प्रयत्न झाला, पण शवविच्छेदन अहवालाने हत्या झाल्याचे स्पष्ट केले. प्रतिष्ठीत कुटुंबात बापाचा खून मुलाने केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने शिर्डीत या घटनेने l खळबळ उडाली आहे. पोलीस निरिक्षक गलांडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि कायंदे हे अधिक तपास करीत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!