श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायत अत्तार : दिनांक 12/02/2025 रोजी दुपारी 03/00 वा. दरम्यान फिर्यादी प्रमोद लक्ष्मण जोशी रा. काळाराम मंदिराच्या मागे, वॉर्ड नं.07, श्रीरामपूर यांच्या मालकीच्या नवॉश मेडीकल अँण्ड जनरल स्टोअर, वॉर्ड नं.06, श्रीरामपूर या मेडीकल मधील कामगार दुपारी जेवण करण्यासाठी गेले असतांना अज्ञात चोरटयाने मेडीकलचे शटर उघडुन मेडीकलमध्ये प्रवेश करुन मेडीकल मधील ड्रावरचा लॉक तोडुन ड्रावरमध्ये असलेले एक लाख तीस हजार रुपये चोरुन नेले त्यावरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 130/2025 बी.एन.एस. कलम 303 (2)331(1) (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीताचे तांत्रिक विश्लेषन करुन व गुप्त बातमीदारामार्फत शोध घेवुन आरोपी नामे विकास लक्ष्मण थोरात रा. उक्कलगांव ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर हा असल्याचा निष्पन्न करुन त्याचा शोध घेवुन त्याचेकडुन गेल्या रक्कमेपैकी 83,000/- रुपये रोख रक्कम हस्तगत करुन सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणला आहे.
तसेच दिनांक 24/02/2025 रोजी नशेच्या गोळया व औषध विक्री करण्यासाठी खंडाळा श्रीरामपूर येथे आलेला आरोपी नामे जावेद सिराज शेख, रा. आडगांव रोड बैलबाजार समोर, लोणी खुर्द ता. लोणी जि. अहिल्यानगर यास पकडुन त्याच्याकडुन नशेचे टरमीन इंन्जेक्शनच्या 10 भरलेल्या बॉटल व 02 खाली बॉटलसह एकुण 83,830 रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यावरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 154/2025 बी.एन.एस. कलम 123,210,278,125 वगैरे प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयातील अटक आरोपीताकडे तपासी अधिकारी तपास करीत असताना सदर आरोपीताने त्यांच्या हाताला झटका देवुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथुन पळुन गेला होता. सदर आरोपीताचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेवुन सदर आरोपीतास 24 तासाच्या आत ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.
सदरच्या दोन्ही गुन्हयामध्ये पोलीस कॉन्टेबल संपत बडे यांनी अतिशय मोलाची कामगीरी बजावुन जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे. त्याबद्दल नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे साो.. अहिल्यानगर पोलीस अधिक्षक मा.राकेश ओला साो.. मा.अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे साो. यांच्या मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे साो. श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर यांनी संपत बडे यांचा बेस्ट कॉप ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मान पत्र देऊन सत्कार केला आहे. तसेच पोनि. नितीन देशमुख साो. व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलदार यांनी संपत बडे यांचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे बेस्ट कॉप ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित

0Share
Leave a reply