श्री स्वामी समर्थ औषधनिर्माणशास्र महाविद्यालयातील २२ विद्यार्थ्यांचे मेड प्लस फार्मा कंपनीमध्ये निवड.
श्री स्वामी समर्थ औषधनिर्माणशास्र महाविद्यालय, माळवाडी, बोटा , ता. संगमनेर जि. अहमदनगर. येथील २२ विद्यार्थ्यांचे मेड प्लस फार्मा पुणे या कंपनी मध्ये निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य प्रा. राकेश टी. वाघ यांनी दिली.
करोनाच्या काळात विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून ११ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. सादर मुलाखतीमध्ये एकूण ७२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी एकूण २२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या निवड प्रक्रियेसाठी मेड प्लस फार्मा कंपनीमार्फत व्यवस्थापक श्री. विनय कृष्णांनी आणि श्री. प्रकाश होळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्द व्हाव्यात म्ह्णून दरवर्षी मुलाखतीचे आयोजन केले जाते. या सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रैनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. सागर एस. सांगळे तसेच महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव एम. पोखरकर, सेक्रेटरी डॉ. अमित एस. पोखरकर, प्राचार्य प्रा. राकेश टी. वाघ व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.