राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी-शनिशिंगणापूर या रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना सार्वजनिक बंधकामं विभागातील प्रशासनाने अतिक्रमण काढण्यासाठी नोटिसा बजावल्या ने व्यवसायिकामध्ये खळबळ उडाली आहे. या महामार्गालगत राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी, गोटुंबे आखाडा, पिंप्रीअवघड, उंबरे, ब्राम्हणी ही मोठी गावे आहेत. तसेच या महामार्गावर ठिकठिकाणी मोठ मोठी हॉटेल्स, धाबे, रसवंतीगृहे, टपरीधारक असे व्यावसाय मोठ्या प्रमाणावर असून राहुरी खुर्दपासून या रस्त्यावर वाहनांची नियमित वर्दळ असते. त्याचप्रमाणे राज्यातून व देशाच्या इतर प्रांतातून मोठ्या प्रमाणावर भाविक शनिशिंगणापूरला दर्शनासाठी येत असल्याने प्रशासनाच्यादृष्टिने हा रस्ता महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाने रस्त्याच्या मध्य भागापासून दोन्ही बाजूस १५ मिटर असा एकूण ३० मिटर रस्ता मोकळा करणार असल्याचे नोटिशीत नमूद केले आहे.
राहुरी-शनिशिंगणापूर या रस्त्यावरील अतिक्रमणावर पडणार हातोडा, प्रशासनाने अतिक्रमणधारकांना काढल्या नोटीसा

0Share
Leave a reply