विशेष प्रतिनिधी पारनेर /वसंत रांधवण : ग्रामीण भागातील यात्रा – जत्रांमध्ये अनेक प्रथा, परंपरा पहायला मिळतात. त्यापैकी काही हटके तर काही वादग्रस्त असतात. सध्या पारनेर तालुक्यातील आदर्श गाव टाकळीढोकेश्वर या गावच्या यात्रेची चर्चा होत आहे.पंचक्रोशीतील सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान असलेले जागृत देवस्थान ग्रामदैवत माता बनाई देवीची मुख्य यात्रा मंगळवार १ मार्चला यावर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार असून त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे जुन्या परंपरेप्रमाणे गावातील गल्लोगल्ली, मुख्य चौकात यात्रेच्या वर्गणीचे दवंडी देऊन यात्रा कमिटीने नोटीस बोर्डावर तसेच उंबऱ्यामागे प्रत्येकी ५०० रुपये वार्षिक वर्गणी जमा करण्याचं आवाहन केले आहे.
गावातील जेवढे उंबरे असतील तेवढ्या ग्रामस्थांनी आपली यात्रेची वर्गणी गावच्या वेशीसमोर पायावर यात्रा कमिटीकडे जमा करावी असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष माजी सरपंच शिवाजी खिलारी व उपाध्यक्ष उपसरपंच रामभाऊ तराळ यांनी केले आहे. सोमवार,दि.३१ मार्च पासून या यात्रा महोत्सवाला सुरुवात होते तर गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी मुक्ताई देवीच्या यात्रेने या यात्रेची सांगता होते.
गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवार दिनांक ३१ मार्च रोजी फकीर शहावाली बाबांचा संदल कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात दारुगोळ्याची आतषबाजी करत यात्रेला सुरुवात होते. मंगळवार दि. १ एप्रिल रोजी बनाईदेवी मुख्य यात्रेनिमित्त सकाळी ८.३० वा काठी मिरवणूक रात्री ७.३० वा भव्य छबिना मिरवणूक आतिषबाजी आणि रात्री १० वा नामवंत तमाशा कलावंत कलाकार तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर या मराठमोळ्या तमाशा कार्यक्रमाचे आयोजन केले असून बुधवार दि.२ एप्रिल रोजी मळगंगा देवीची सकाळी ८.३० वा काठी मिरवणूक दुपारी चार वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात येणार आहे. रात्री ७.३० वा भव्य पालखी छबिना मिरवणूक तर गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी मुक्ताई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी ८.३० वा काठी मिरवणूक रात्री ७.३० वा भव्य छबिना मिरवणूकीने या चार दिवसीय यात्रेची सांगता होते. या यात्रा उत्सवाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बनाईदेवी यात्रा उत्सव कमिटी व टाकळी ढोकेश्वर समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
ऐका हो ऐका..! बनाईदेवीची यात्रा; उंबऱ्यामागे वर्गणी ५०० रुपये, बनाईदेवी यात्रा कमिटीकडून वर्गणीचं आवाहन

0Share
Leave a reply