दिशाशक्ती प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : मराठा विद्या प्रसारक समाज संस्था आदर्श इंग्लिश मिडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या आगमनानंतर स्वागत गीताने करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, सरस्वती माता, नटराज व बागलाणचे आराध्य दैवत यशवंतराव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
वार्षिक स्नेहसंमेलनासाठी बागलाण तालुका आमदार मा.श्री. दिलीप मंगळू बोरसे, म.वि.प्र. समाज संस्थेचे सरचिटणीस मा.श्री. नितीनजी ठाकरे साहेब, मा. चिटणीस श्री. दिलीप (भाऊसा) दळवी, म.वि.प्र. संस्थेच्या महिला संचालिका श्रीम. शालनताई सोनवणे, मा.प्रसाद दादा सोनवणे (तालुका संचालक) ,बागलाण तालुक्याचे तहसीलदार श्री. कैलास चावडे, श्रीम. प्रतिभा चावडे तसेच होरायझन व आदर्श स्कूलचे शिक्षणाधिकारी डॉ. कैलास शिंदे, प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी प्रा. श्री. डी.डी.जाधव ,जि.प.शिक्षण विस्तार अधिकारी , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुनील दादा सोनवणे श्री. हिरालाल बधाण ,सामाजिक कार्यकर्ते अरुण दादा सोनवणे, मराठा हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री. विनायक बच्छाव सदस्य श्री. बाजीराव सोनवणे, श्री. माधव सोनवणे, श्री. किरण नारायण नांद्रे,पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. अनिल जाधव, सदस्य श्रीम. रोहिणी खैरनार, श्री. सचिन देवरे श्री. यशवंत धोंडगे श्रीम. काजल येवला, श्रेयश ताटिया,पत्रकार प्रवीण पवार, योगेश सोनवणे, अबॅकस आय जीनियसच्या संचालिका श्रीम.नीता पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. वैशाली सोनवणे यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला व प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना प्रेरित करणारे विचार मांडले.कुठलाही कार्यक्रम म्हटला की आधी गणरायांचे स्मरण करण्यात येते. गणेश वंदना द्वारे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शाळेतील ज्युनिअर केजी चे चिमुकले विद्यार्थी पोलिसांच्या वेशभूषेध सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात अनेक कलाविष्कार सादर केले वैयक्तिक नृत्य, सामूहिक नृत्य, नाटिका, वकृत्व, विविध वेशभूषेत आलेले विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.शिवराज्याभिषेक सोहळ्याने तर सगळ्यांची मन जिंकून घेतले शिवराज्याभिषेक मध्ये इ.5 वी ते 9 वी चे एकूण 120 विद्यार्थी सहभागी झाले होते.अनेक नृत्य शिवराज्याभिषेक मध्ये सादर करण्यात आले. शिवरायांची भूमिका कलाशिक्षक श्री.जाधव दीपक यांनी केली.
या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षण अधिकारी माननीय श्री कैलास शिंदे सरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले व त्यांना मोलाचे मार्गदर्शन दिले. तसेच नीता पवार यांनीही अबॅकस विषयी मुलांना व पालकांना मार्गदर्शन केले.त्याच पद्धतीने शाळेतील महिला शिक्षिकांनी “बाई पण भारी देवा’ या गाण्यावर ठेका धरला. या नृत्याने तर सगळ्यांचेच मन वेधून घेतले . सगळ्यांनीच महिला शिक्षिकांचे फारच कौतुक केले. वार्षिक स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. अविनाश वाघ व श्रीम.सारिका कदम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान देणारे कोरिओग्राफर राहुल सर व त्यांची टीम, शाळेतील सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
Leave a reply